Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : प्रवासी मजुरांना मदतीचा हात देणाऱ्या सोनू सूदच्या सोशल मीडियावर पडतो आहे हजारो मॅसेजचा पाऊस … !!

Spread the love

कोरोना लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचविणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे . दरम्यान सोनू सूदकडे दररोज हजारो लोक मदत मागत असल्याचे वृत्त आहे. ई-मेल, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटवर सोनूच्या प्रत्येक सोशल मीडियाचा मेसेज बॉक्स मदतीच्या मागण्यांनी भरलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. सोनूला दररोज 1137 ई-मेल, 19000 फेसबुक मेसेज, 4812 इन्स्टाग्राम मेसेज, 6741 ट्विटर मेसेज मदतीसाठी येतात. यावर सोनू शक्य तितक्या लोकांना मदत करण्याचं प्रयत्न करतो असा लोकांचा अनुभव आहे.

दरम्यान आता सोनू सूदने प्रवासी मजुरांना घर देणार असल्याची माहिती आपल्या ट्विटरवर दिली आहे. सोनूने ट्वीट केलं आहे, “20 हजार प्रवासी मजुरांना मी आता घर ऑफर करत आहे. प्रवासी रोजगारच्या माध्यमातून ज्या मजुरांना नोएडामध्ये काम मिळालं आहे, त्यांना मी घर देऊ इच्छित आहे. नॅशनल असोसिएशन फॉर एलिव्हेशन कॉन्ट्रॅक्टरचे अध्यक्ष ललित ठकुराल यांच्या मदतीने मला हे साध्य करता येत आहे.” प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी सुखरूपपणे पोहोचविणे , त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि आता याच  20 हजार मजुरांना हक्काचं घर देण्याचा संकल्प सोनू सूद याने केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!