Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : कळीचा मुद्दा : पुन्हा एकदा दाऊद , पाकिस्तानच्या कबुलीवरून भारताच्या दाव्यावर शिक्कामोर्तब

Spread the love

पाकिस्तानने  मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीत असल्याची कबुली स्वतःहून दिल्यामुळे हा वादग्रस्त आणि कळीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.  पाकिस्तान सरकारच्या कागदपत्रातून दाऊद सध्या कराचीमध्ये राहत असल्याची माहिती उघड झाली आहे.  आंतरराष्ट्रीय दहशतवादाला रसद पुरवणाऱ्यांवर देखरेख ठेवणाऱ्या ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ (FATF) या संस्थेच्या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी पाकिस्तानने ८८ दहशतवादी संघटनांवर बंदी घातली आहे. त्यानुसार कुख्यात दहशतवादी हाफिज सईद, मसूद अझर आणि दाऊद इब्राहिम यांच्या अनेकजणांवर आर्थिक निर्बंध घातल्याचे जाहीर केल्यानंतर हि बाब उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांची संपत्ती जप्त करणे आणि बँक खाते सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पॅरिस येथील ‘फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स’ (FATF) या संस्थेने जून २०१८ मध्ये पाकिस्तानला ग्रे यादीत ठेवले होते. त्यानुसार पाकिस्तानने तातडीने २०१९ पर्यंत दहशतवादी संघटनांविरोधात टेरर फंडिंगसंदर्भात आपला कृती आराखडा पूर्ण करण्याची सूचना केली होती. मात्र, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे कारवाईची मुदत वाढवण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने १८ ऑगस्ट रोजी दोन अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार , २६/११ मुंबई हल्ल्यााचा मास्टरमाईंड आणि जमात-उद-दवा या संघटनेचा म्होरक्या सईद, जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मसूद अझर आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यावर निर्बंध लादण्याची घोषणा करण्यात आली. दाऊद इब्राहिम १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी आहे.

दरम्यान पाकिस्तान वृत्तपत्र, ‘द न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने नुकतेच संयु्क्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जारी करण्यात आलेल्या सूचीतील ८८ दहशतवादी संघटनांवर बंदी घातली असल्याचे म्हटले आहे. यामध्ये जमात-उद-दवा, जैश-ए-मोहम्मद, तालिबान, दाएश, हक्कानी गट, अल कायदा आदींचा समावेश आहे. या संघटनांशी संबंधित बँक खातीही सील करण्यात आली आहेत. पॅरिसमध्ये फेब्रुवारीत झालेल्या झालेल्या ‘एफएटीएफ’च्या (फायनान्शिअल अॅक्शन टाक्स फोर्स) आंतराराष्ट्रीय परिषदेत तुर्की आणि मलेशियाने पाकिस्तानला पाठिंबा दिला. या पाठिंब्यामुळे पाकिस्तानचे स्थान ग्रे यादीत कायम राहिले होते. दहशतवाद्यांना आर्थिक मदत आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी वॉचडॉगच्या भूमिकेत असणाऱ्या एफएटीएने पाकिस्तानला २७ सूत्री कार्यक्रम दिला आहे. त्याअनुषंगाने पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात पावले उचलावी लागणार आहेत. यापैकी १४ मुद्यांवर याआधीच पावले उचलण्यात आली असून इतर ११ मुद्यांवर अंशत: अंमलबजावणी सुरू असल्याचे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!