Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaNewsUpdate : फेसबुकला कुठल्याही राजकीय पक्षाशी देणे घेणे नाही , कुठल्याही विचारधारेचे आम्ही समर्थन करीत नाही , फेसबुकचा पुन्हा खुलासा

Spread the love

देशात सर्वत्र फेसबुकच्या भूमिकेवरून शंका घेतली जात असताना वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या  फेसबुकने शुक्रवारी आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिले आहे. आमचे कोणत्याही पक्षाशी काहीही देणेघेणे नसून, नेत्यांकडून करण्यात येणारा आक्षेपार्ह मजकूर आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचे काम सुरूच ठेवू, असे फेसबुकने स्पष्ट केले आहे. दरम्यान सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या पोस्टना फेसबुकने ‘हेट स्पीच’चे नियमा लागू केले नाहीत असा  प्रश्न फेसबुकवर करण्यात आला आहे. फेसबुकच्या मजकुराच्या धोरणाचे (कंटेंट पॉलिसी) भारतात तटस्थपणे भेदभाव न करता पालन केले जात नाही आणि भारतीय जनता पक्षाबाबत नरमाईची भूमिका दाखवली जात आहे, असा आरोप द वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत आरोप करण्यात आला होता. या नंतर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षात संघर्ष सुरू झाला.

दरम्यान फेसबुक इंडियाने उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी ब्लॉग लिहिला असून त्यात त्यांनी म्हटले आहे कि , ‘फेसबुक हे खुले आणि पारदर्शी प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म कोणत्याही विचारधारेचे समर्थन करत नाहीत. या प्लॅटफॉर्मवर आपले विचार व्यक्त करण्याचे लोकांना स्वातंत्र्य आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आमच्यावर आमचे धोरण लागू करण्यात पक्षपात करत असल्याचा आरोप झाला. आम्ही हा आरोप गांभीर्याने  घेत आहोत आणि आम्ही द्वेष आणि कट्टरतेच्या प्रत्येक प्रकाराचा निषेध करीत आहोत.”

आपल्या ब्लॉगमध्ये मोहन यांनी पुढे म्हटले की, फेसबुकवर लोड होणाऱ्या मजकुराबाबत फेसबुकचे धोरण निष्पक्षपातीपणाचेच राहिलेले आहे. आम्ही कम्युनिटी स्टँडर्डचे कठोरपणे पालन करत आहोत. यात राजकीय स्थिती, विचारधारा किंवा धार्मिक आणि सांस्कृतिक विश्वासाचा कधीही पर्वा करत नाही. आम्ही नेत्यांद्वारे केलेला आक्षेपार्ह मजकुर आमच्या प्लॅटफॉर्मवरून हटवला असून पुढे देखील आम्ही हे करत राहू. माहिती तंत्रज्ञानाबाबतच्या संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष शशी थरूर यांनी फेसबुकच्या प्रतिनिधींना २ सप्टेंबरला या मुद्द्यावर आपली बाजू मांडण्यासाठी बोलावले आहे. यावरून भारतीय जनता पक्षाने शशी थरूर यांच्याविरोधात आघाडीच उघडली आहे. दरम्यान थरूर यांनी समिती सदस्यांशी या प्रकरणी बातचित केली नसल्याचे समितीचे सदस्य आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे. त्यांना एकट्याला अशा प्रकारची कारवाई करण्याचा काहीएक अधिकार नसल्याचे दुबे म्हणाले. यामुळे थरूर यांना अध्यक्षपदावरून हटवून दुसऱ्या कोणाची तरी नियुक्ती करावी अशी मागणीच दुबे यांनी केली आहे. मात्र, दुबे हे संसदेचा अपमान करत आहेत, असे थरूर यांचे म्हणणे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!