Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोठी बातमी : औरंगाबाद खंडपीठाकडून तबलिगी जमातीच्या विरोधातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश

Spread the love

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने  दिल्लीतील निझामुद्दीन मरकझ प्रकरणातील तबलिगी जमातच्या देश आणि परदेशातील तबलिगीच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले आहेत. दरम्यान कोरोना काळात तबलिगी जमातीला ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आल्याचे  निरीक्षणही न्यायालयाने  यावेळी नोंदवलं आहे . सोबतच चुकीचं वार्तांकन करणाऱ्या मीडियाला फटकारताना, या लोकांना फैलावलेल्या संक्रमणासाठी आरोपी ठरवण्याचा प्रोपोगंडा चालवण्यात आल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या  या निर्णयानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर निशाणा साधताना  ‘या प्रोपोगंडाच्या सहाय्याने मुस्लिमांना द्वेष आणि हिंसेचं शिकार व्हावं लागलं’ असे  म्हटले आहे.


एएनआय च्या वृत्तानुसार या प्रकरणाची औरंगाबाद खंडपीठात आज शनिवारी सुनावणी झाली. यावेळी, ‘दिल्लीच्या मरकझमध्ये आलेल्या परदेशी लोकांविरुद्ध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून मोठा प्रोपोगंडा चालवण्यात आला. भारतात फैलावणाऱ्या कोविड १९ संक्रमणाचा जबाबदार हे परदेशी लोक आहेत, अशी वातावरण निर्मिती करण्यात करून तबलिगी  जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आले असे न्ययालयाने म्हटले आहे. दरम्यान ‘याचिकाकर्त्यांच्या विरोधात अशा पद्धतीची कारवाई व्हायलाच नको होती, असे  भारतातील सध्याच्या  संक्रमणाच्या आकडेवारीवरून  दिसत आहे. त्यावर पश्चाताप करून  नुकसान भरपाईसाठी सकारात्मक पाऊल उचलणं गरजेचं आहे’ असेही  खंडपीठाने नमूद केले आहे.

औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयानंतर हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करून न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘योग्य वेळेवर योग्य निर्णय’ असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. ‘भाजपला वाचवण्यासाठी मीडियाने तबलिगी  जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आलं. या संपूर्ण प्रोपोगंड्यानं देशभरातील मुस्लिमांना द्वेष आणि हिंसेचं शिकार व्हावं लागलं’ असेही ओवैसी यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!