Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : एका नजरेत जाणून घ्या राज्य , देश आणि जगाची कोरोनाची ताजी स्थिती

Spread the love

गेल्या २४ तासात राज्यात सलग तिसऱ्या दिवशी राज्यात  तब्बल 14,492 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 297 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 6,61,942 एवढी झाली आहे.  आत्तापर्यंत 4,80,114 एवढे रुग्ण बरे झाले आहेत. तर 1,69,516 एवढ्या रुग्णांवर राज्यात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाCoronaNewsUpdate ने दिली आहे. दरम्यान राज्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 71.45 टक्के एवढे आहे. तर मृत्यू दर हा 3.27 एवढा आहे.

दरम्यान देशात कोरोनाच्या रुग्णांची वाढत असली तरी त्यांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. देशभरात शनिवारी एका दिवसात सर्वाधिक म्हणजे  63 हजार  ,631  इतकी आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या नागरिकांची संख्या १५ लाखांहून अधिक आहे. यासोबतच रुग्ण बरे होण्याचा दर 74.69 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 21 दिवसांत करोनामुक्त होणाऱ्या नागरिकांची संख्या ही दुपटीहून अधिक झाली आहे. देशात एक ऑगस्टपर्यंत करोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ही 10,94,374 इतकी होती. ती वाढून आता 21ऑगस्टपर्यंत 22,22,577 इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

गेल्या 24 तासांत देशात करोनाचे 69, 878 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर देशातील करोनाच्या रुग्णांची एकूण 29,75, 701 इतकी झाली आहे. 21 ऑगस्टला 63,631 जण करोनामु्क्त झाले तर, 945 रूग्णांच्या मृत्यू झाला. देशभरात सध्या कोरोनाच्या ६,९७,३३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एएफपीच्या आकड्यांनुसार जगभरात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या  8 लाख आहे. तर दुसरीकडे संसर्ग झालेल्यांची संख्या 2 कोटींच्या पार गेली आहे. वर्ल्ड ओ मीटरच्या आकड्यांनुसार संपूर्ण जगभरात 2 कोटी 31 लाख 49 हजार 731 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यामुळे 8 लाख 03 हजार 807 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 57 लाख, 32 हजार 515 रुग्ण कोरोनातुन मुक्त झाले आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रकरणात अमेरिका जगभरात पहिल्या, ब्राजील दुसरा आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मृत्यूची सर्वाधिक संख्या अनुक्रमे अमेरिका, ब्राजील, मेक्सिको या देशात आहे. भारतात या यादीच चौथा क्रमांक आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!