Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ViralPostTruth : चर्चेतली बातमी : सर्वोच्च न्यायालयाने आपले घोषवाक्य खरोखरच बदलले आहे काय ? जाणून घ्या सत्यता…..

Spread the love

आज दिवसभरात सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालयाच्या घोषवाक्यात  भारताच्या राजमुद्रेच्या खाली ” सत्यमेव जायते ” असे घोषवाक्य बदलून त्याच्या ऐवजी ” ‘यतो धर्मस्ततो जयः ” असा बदल केला असल्याच्या पोस्ट व्हायरल होत असून त्याची सत्यता जाणून घेण्यासंबंधी महानायक ऑनलाईन कडे अनेक यूजर्स आणि वाचकांनी विचारणा केली असता त्याचा महानायक ऑनलाईन चा शोध असा आहे. प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार पुण्य प्रसून वाजपेयी यांनी दोन फोटो ट्विट करीत हा दावा केला होता  की, भारतीय सर्वोच्च नायालयाने आपले चिन्ह बदलून ‘सत्यमेव जयते’ (सत्याचा नेहमी विजय होतो) या ऐवजी आता ‘यतो धर्मस्ततो जयः'(जेथे धर्म तेथे विजय आहे) असे केले आहे. परंतु, काही वेळानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. तरीही आधी ट्विटर युजर्संनी आणि नंतर सोशल मीडियावरील अनेक यूजर्सनी या संबंधीच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत.

भारताच्या राजमुद्रेवर मात्र ” सत्यमेव जयते ” असेच घोषवाक्य लिहिले असून . सर्वोच्च न्यायालयाशिवाय इतर उच्च न्यायालयांच्या लोगोवही ” सत्यमेव जयते ” असेच लिहिलेले आहे. दरम्यान भारतातील ज्या ज्या घटनात्मक संस्था आहेत. त्यांचे प्रत्येकाचे घोषवाक्य वेगवेगळे आहे. जसे ” आकाशवाणी : बहुजन हिताय , बहुज हिताय ” , आयुर्विमा ” योग्य क्षेमं वहाम्यहम ” , पोलीस : सदरक्षणाय खलनिग्रहणाय, महाराष्ट्र एसटी : बहुजन हिताय , बहुजन सुखाय” , पर्यटन विभाग : अतिथी देवोभव:” , महाराष्ट्र शासन : दिव्यांची समयी आणि त्यावर ” प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्व वंदिता महाराष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते ”  असे आहे  तसे सर्वोच्च न्यायालयाचेही स्वतःचे घोषवाक्य आहे.  तात्पर्य, सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाच्या घोषवाक्यात आणि चिंन्हांत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही , त्यामुळे सोशल मीडियावर यावरून केले जात असलेले दावे केवळ एक अफवा आहेत.

महानायक ऑनलाईनने याचा याचा शोध घेतला असता सर्वोच्च नायालयाने आपले चिन्ह किंवा त्याच्या घोषवाक्यात कुठलाही बदल केलेला नाही . सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य पूर्वीपासूनच  ‘यतो धर्मस्ततो जयः असेच आहे. याआधीही  त्यात ‘सत्यमेव जयते’ हे घोषवाक्य कधीच नव्हते. दरम्यान टाईम्स फॅक्ट चेकनेही याच माहितीवर शिक्कामोर्तब केले आहे. टाईम्स ने यासंबंधीच्या माहितीत म्हटले आहे कि , टाइम्स फॅक्ट चेकने याची सत्यता जाणून घेण्यासाठी त्यांनी सर्वात आधी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची वेबसाइट शोधली. त्या ठिकाणी त्यांना  कोणतीही प्रेस रिलीज किंवा नोटिस मिळाली नाही. ज्यात घोषवाक्य बदलण्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातही  कुठेही सत्यमेव जयते संबंधित माहिती नाही.

टाईम्सच्या वृत्तानुसार आधीपासूनच  सुप्रीम कोर्टाचे घोषवाक्य ‘यतो धर्मस्ततो जय:’ हेच राहिले आहे. प्रत्येक कोर्टात ज्या ठिकाणी न्यायाधीश बसतात. त्यांच्या मागे हे चिन्ह लावलेले आहे. स्वातंत्रानंतर जेव्हापासून सुप्रीम कोर्ट आहे. तेव्हापासून याचे घोषवाक्य आणि चिन्ह हेच आहे. दरम्यान काही कीवर्ड सर्च केल्यानंतर त्यांना २०१७ चा एक ब्लॉग मिळाला. याचे शीर्षक, ‘Supreme Court of India’s Logo‘ होते. यात सांगितले होते की, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिक चिन्ह अशोक चक्र आहे. परंतु, याच्या खाली लिहिलेले घोषवाक्य ‘यतो धर्मस्ततो जय:’ हेच आहे.

आज तकच्या माहितीनुसार एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारात सर्वोच्च न्यायालयाच्या घोषवाक्यासंबंधी  माहिती मागितली होती. त्यावर सांगण्यात आले की, सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य महाभारतातील श्लोक ‘यतः कृष्णस्ततो धर्मो यतो धर्मस्ततो जयः’ मधून घेण्यात आले आहे. त्यानंतर अनेक लोकांना माहिती दिल्यानंतर पत्रकार प्रसून वाजपेयी यांनी एक ट्विट करून सांगितले की, सुप्रीम कोर्टाचे घोषवाक्य नेहमीपासून हेच राहिले आहे. याबद्दल त्यांनी खेदही प्रकट केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!