Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaNewsUpdate : कोरोनाबाधितांचा रेकॉर्ड मोडला , जाणून घ्या देशाची आजची ताजी परिस्थिती

Advertisements
Advertisements
Spread the love

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या संसर्गाचा वेग वाढला असून आज पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतचा रेकॉर्डही 24 तासात मोडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या मााहितीनुसार 24 तासांत 69,652 नवीन लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 997 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एका दिवसात जवळपास 62 ते 65 हजार नवीन रुग्णांची आतापर्यंत नोंद होत होती. आज मात्र गेल्या 24 तासांतील सर्वात धक्कादायक आकडेवारी आहे. 70 हजाराच्या जवळपास ही आकडेवारी जाणारी आहे. देशात आतापर्यंत कोरोनाग्रतांचा आकडा 28 लाख 36 हजार 926 वर पोहोचला आहे. त्यापैकी 6 लाख 86 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Advertisements

कोरोनामुळे आतापर्यंत देशात 53 हजार 866 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण वाढत आहे. कोरोनामुळे एका दिवसात महाराष्ट्रात सर्वाधिक 346 पंजाबमध्ये 22, मध्य प्रदेशात 18, गुजरातमध्ये 17, उत्तराखंडमध्ये 14, जम्मू-काश्मीरमध्ये 11, बिहार, राजस्थान, हरियाणा, ओडिशा आणि आसाममध्ये 10-10, दिल्लीत 9, तेलंगण आणि गोव्यामध्ये 8-8, केरळमध्ये रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 20 लाख 96 हजार 665 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे. भारताचा रिकव्हरी रेट 64.5% वरून 73.9%. वर पोहोचला आहे. तर मृत्यू दर 1.9 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

Advertisements
Advertisements

देशात सध्या 6 लाख 86 हजार 395अॅक्टिव्ह केसेस असल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली. गेल्या काही दिवसांमध्ये देशात करोना चाचण्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 9लाख 18 हजार 470करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 3  कोटी 26  लाख 61  हजार 252 करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!