Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainNewsUpdatate : महाराष्ट्रासह गुजरात, आणि गोवा राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस

Spread the love

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून पश्चिम महाराष्टात कोल्हापूरसह काही ठिकाणी पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. दरम्यान येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर हे क्षेत्र पुढच्या २४ तासांत अधिक तीव्र होण्याची व पुढच्या ३-४  दिवसांत पश्चिमेकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी येत्या ४-५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोवा सर्वत्र मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे शहरांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे. एवढेच नाही तर गणरायाच्या आगमना दिवशी म्हणजे 22 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात ५  जिल्हे वगळता सरासरीपेक्षा ८ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!