Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : GoodNews : चोरट्यांकडून पोलिसांनी जप्त केलेली साडेसहा लाखाची रक्कम केली फिर्यादीला परत…

Spread the love

औरंंंगाबाद : कुटुंबासह मुंबईला गेलेल्या सिडको, एन-४ मधील डॉक्टरचे घर फोडून चोरट्यांनी ७८ तोळे सोने आणि चार लाख ७९ हजार पाचशे रुपयांची रोकड लांबवली होती. पोलिसांनी चोरट्याकडून जप्त केलेले ३९९.२९ ग्रॅम सोने आणि बँक खाते गोठवून हस्तगत केलेले सहा लाख ५९ हजार ३९३ रुपये सेवानिवृत्त डॉ. नामदेव कलवले कुटुंबाला पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते सोमवारी (दि.१७) परत करण्यात आली.

मुळचे लातूरच्या अहमदपुर तालुक्यातील हडोळती येथील सेवानिवृत्त शल्यचिकित्सक डॉ. नामदेव कलवले (वय ६७, रा. एफ-१, बी-सेक्टर, एन-४, सिडको) हे कुटुंबियांसह २८ डिसेंबर रोजी कार्यक्रमानिमित्त मुंबईला गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंगल्यात शिरुन दरवाजाचे कुलूप तोडून ७८ तोळ्याचे सोने आणि चार लाख ७९ हजार पाचशे रुपयांची रोकड लांबवली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पुंडलिकनगर पोलिसांनी सीसीटीव्ही पुâटेजच्या आधारे कुख्यात घरफोड्या सय्यद सिकंदर व त्याचा साथीदार शंकर तानाजी जाधव यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, दोघांनी चोरी केलेले सोने जालन्यातील सराफा व्यावसायीक अनिल शेळके याला विक्री केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे पोलिसांनी सराफा व्यापारी अनिल शेळके याला ताब्यात घेऊन ३९९.२९ ग्रॅमची लगड त्याच्याकडून जप्त केली होती. तसेच सिवंâदरची मैत्रिण रेश्मा निसार शेख हिच्या बँक खात्यात सहा लाख ५९ हजार रुपये हस्तगत केले होते.

दरम्यान, आज गणेश मंडळाच्या बैठकीचे आयोजन पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे, सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, जमादार नारायण लोणे, एम. सी. घुसिंगे व गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. कलवले व त्यांच्या पत्नी चंद्रभागा कलवले यांना दागिने आणि रोकड परत करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!