Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : बनावट नोटा चालनात आणणार्‍याचा जामीन अर्ज फेटाळला

Spread the love

औरंंंगाबाद :  शंभर रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणणार्‍या त्रिकुटास पुंडलिक नगर पोलिसांनी गजाआड केले होते. त्रिकुट सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलिसांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सय्यद सैफ सय्यद असदने दाखल केलेला नियमीत जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.बी. पारगांवकर यांनी  फेटाळून लावला.

शंभर रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणणार्‍या  शेख समरन ऊर्फ लक्की रशिद शेख (वय २७) रा. नेहरूनगर,  सय्यद सैफ सय्यद असद (वय २४) रा. कटकटगेट आणि सय्यद सलीम सय्यद मोहम्मद यार (वय २२) रा. कृष्णानगर राजणगाव शेनपुंजी या त्रिकुटास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने १ नोव्हेंबर २०१९ रोजी सापळा रचून अटक केली होती. त्याच्या ताब्यातून शंभर रुपयाच्या  ८६ हजार २०० रुपयाच्या बनावट नोटा, प्रिंटर, संगणक जप्त करण्यात आले होते. त्या त्रिकुटाची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

——————————————————-

पीपल्स बँकेला गंडा घालणार्‍या आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ

औरंंंगाबाद : बनावट कागदपत्रांआधारे वाहन कर्जावर घेतलेली कार परस्पर अहमनगर जिल्ह्यात विक्री करुन पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला १५ लाख ४० हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी आरोपी मंगेश पंढरी शिरसाट (वय ४५, रा. नारळीबाग) याच्या पोलिस कोठडीत १९ ऑगस्टपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी सोमवारी (दि. १७) दिले.

या प्रकरणी पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे शाखा अधिकारी महावीर त्रिलोकचंद लोढा (वय ४८) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, रेल्वे स्टेशन रस्त्यावरील ओमप्रकाश देवडा पिपल्स को – अ‍ॅप – बँकेकडून मंगेश शिरसाट याने वाहन (एमएच २० इवाय ५५३९) कर्जावर घेतले होते. वाहनावर कर्ज घेतल्यानंतर त्या वाहनाचे नियमीत हप्ते भरले नाहीत, हप्ते भरण्यात यावे यासाठी बँकेने पाठपुरावा केला असता कर्जदार मंगेश आणि जामीनदार असलेल्या त्याच्या भावाने हप्ते नियमीत भरतो असे अश्वासन  बँकेला दिले होते.

दरम्यान, मंगेशने बँकेच्या हप्त्याची परतफेड न करता कर्जावर घेतलेली कार परस्पर विकून बँकेची फसवणूक केली असल्याची तक्रार महावीर लोढा यांनी वेदांत नगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीवरुन मंगेशसह पाच जणा विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!