Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldCrimeNewsUpdate : याला म्हणतात राष्ट्राध्यक्ष !! सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकलेल्या स्वतःच्या पक्षातील ४ पदाधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या…

Spread the love

उत्तर कोरियातील  सेक्स  रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या सहाजणांना राष्ट्राध्यक्ष आणि सत्ताधारी वर्कर्स पार्टीचे महासचिव असलेल्या किम जोंग उन यांच्या आदेशाने ठार करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.  विशेष म्हणजे या प्रकरणातील चार जण त्यांच्याच पक्षाचे सदस्य होते. अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या रेडिओ फ्री आशियाने याबाबत  वृत्त दिले आहे. वेश्या व्यवसायामध्ये असलेल्या काही तरुणी प्योंगयांग या शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्यांना मृत्यूदंडाचा आदेश खुद्द किम यांनी दिला असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. किम यांच्यासमोरच  दोषींवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. एकूण सहाजणांना  या प्रकरणात ठार करण्यात आले असून त्यातील चौघेजण हे किम यांच्या पक्षाचे पदाधिकारी होते.

या प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना  या अधिकाऱ्याने सांगितले की, हे दोषी मागील काही वर्षांपासून सेक्स रॅकेट चालवत होते. या सेक्स रॅकेटमध्ये आपल्याच पक्षातील सदस्यांचे नाव समोर येताच किम यांनी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले. या सेक्स रॅकेटमध्ये प्योंगयांगमधील काही अधिकाऱ्यांचा समावेश होता. वेश्या व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थींनींना अर्ध वेळ नोकरीचे आमिष दाखवत प्रति महिना ५०० डॉलर इतकी रक्कम देण्यात येत होती. या सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या तरुणींचे सरासरी वय २० वर्ष आहे. विद्यार्थीनींनी या सेक्स रॅकेटबाबत पोलिसांना माहिती दिली. या पीडितांना सुरुवातीला पैसे देण्यात आले. त्यानंतर जबरदस्तीने त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आणि आरोपींना अटक केली.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, दोषींना गोळ्या झाडून ठार मारण्याचे आदेश किम यांनी दिले होते. उत्तर कोरियात सेक्स रॅकेट, वेश्या व्यवसाय करण्याची शिक्षा एक ते पाच वर्षाचा तुरुंगवास अशी आहे. मात्र, या गुन्ह्यात कोणीही सहभागी असेल तरी कठोर शिक्षा दिली जाऊ शकते, याचा संदेश देण्यासाठी किम यांनी दोषींना गोळ्या मारण्याचा आदेश दिला असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. सध्या किम यांनी उत्तर कोरियातील वेश्या व्यवसायाविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!