Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : गेल्या २४ तासात वाढले 64,553 नवे रुग्ण , एकूण रुग्णसंख्या 24,61,191

Spread the love

गेल्या 24 तासांतही 66 हजार 552 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 1007 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 24 लाख पार झाला आहे. देशात सध्या आता 24 लाख 61 हजार 190 रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातल कोरोनाचे 6 लाख 61 हजार 595 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 48 हजार 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकमेव दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 17 लाख 51 हजार 555 रुग्ण निरोगी झाले आहेत.

महाराष्ट्रात गुरुवारी पहिल्यांदाच सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी तब्बल 413 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 3.4 टक्के एवढा असून तो देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्यात आज 11 हजार 813 नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 5 लाख 60 हजार 126 एवढी झाली आहे. राज्यात आज नऊ हजार 115 रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत एकूण 3 लाख 90 हजार 958 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.8 टक्के इतका आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!