Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आता हद्द झाली… !! गुटखा चघळत वकील करीत होता न्यायमूर्तींशी वार्तालाप…मग पुढे असे झाले ? !!!

Spread the love

देशाच्या सर्वोच्च  न्यायालयांमधील व्हर्च्युअल सुनावणी दरम्यान  न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी एक वकील गुटखा चघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर चांगलेच फटकारले.  विशेष म्हणजे असे मनोरंजक, हास्यास्पद आणि खेदजनक किस्से न्यायमूर्तींसमोर घडावेत हे आश्चर्यजनक आहे. देशात करोनाच्या उद्रेकानंतर देशभरात न्यायालयांमध्ये व्हर्च्युअल सुनावणीच्या सुनावणीदरम्यान अनेक चित्रविचित्र घटना समोर आल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याचे असे झाले कि , वीडियो कॉन्फरसिंग द्वारे चालू असलेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अरुण मिश्रा यांच्यासमोर एक अजब किस्सा घडला. यामध्ये एक वकील महाशय न्या. मिश्रा यांना गुटखा चघळत बोलत होते . न्यायमूर्तींच्या हि गोष्ट लक्षात येताच संबंधित वकिलाला चांगलेच फैलावर घेतले. न्या . म्हणाले ” काय करत आहात? तुम्हाला न्यायालयाची प्रतिष्ठा आदर समजत नाही ? न्यायालयाची हि फटकारे ऐकताच वकिलाने भानावर येत लगेच क्षमा मागितली. त्यावर न्या . म्हणाले, ” काय माफ करायचे ? तुमच्यासाठी हा इशारा आहे . पुन्हा असे घडले तर याद राखा. आणि प्रकरण माफीवर निभावले. अशा प्रकरणात एक तर सुनावणी कॅमेऱ्यापुढे आपल्याच घरात बसून होत असल्याने कदाचित वकील असे वागत असतील,  असे म्हटले जात आहे परंतु  काहीही असले तरी जेव्हा न्यायमूर्ती समोर असतात आणि सुनावणी सुरू झालेली असते, युक्तीवाद सुरू असतात, तेव्हा व्हर्च्युअल असले तरी देखील कोर्टच सुरू असते. अशा वेळी कोर्टाच्या मर्यादा आणि सन्मानाचे भान राखणे आवश्यक असल्याचेच न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त करताना वकिलांना खडसावले आहे.

दरम्यान ज्येष्ठ वकील राजीव धवन यांचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान पाईप्स ओढणे आणि नंतर हुक्का पिताना दिसले. पण कोर्टाने एकतर ते पाहिले नसावे किंवा मग त्याकडे दुर्लक्ष केले असावे असे म्हटले जात आहे. याशिवाय गुरुवारी राजस्थान हायकोर्टाच्या जयपूर खंडपीठात बसपाच्या सहा आमदारांचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना वरिष्ठ अधिवक्ता राजीव धवन यांच्यासोबत ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही एका वकिलाने आपल्या घराच्या बेडरूममध्ये पलंगावर पांढरा टी-शर्ट घालून कोर्टापुढे यु्क्तीवाद करणे सुरू केले होते. त्यानंतरही कोर्टाने त्या वकिलाला फटकारले आणि कोर्टाच्या मर्यादेची आठवण करुन दिली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!