Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : प्रामाणिक करदात्यांच्या सन्मानासाठी मोदीसरकाराचा नवा मंच , कर प्रणालीच्या बदलाविषयी काय बोलले पंतप्रधान ?

Spread the love

प्रामाणिक करदात्यांचा सन्मान करण्यासाठी “ट्रान्सपरन्ट टॅक्सेशन ऑनरिंग दि ऑनेस्ट”  ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ या मंचाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.  यानिमित्ताने आयोजित परिषदेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ खात्यातील वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजक उपस्थित आहेत. या निमित्ताने बोलताना मोदी यांनी आपल्या भाषणात आधीच्या सरकारने कर प्रणालीच्या अनुषंगाने केलेले कार्य कसे तोकडे होते ? त्याकाळात कर भरणारी संख्या कमी आणि  विवादांची संख्या अधिक होती त्यात आम्ही गेल्या ५-६ वर्षात मोठे बदल केले आहेत याची जाणीव करून देत अप्रत्यक्षरीत्या टीका करण्याची संधी सोडली नाही. दरम्यान कररचनेत नाहीत पण कर भरु शकतात त्यांनी पुढे येऊन कर भरला पाहिजे. स्वातंत्र्य दिनानिमित्त याचा विचार करा असं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केलं.

युपीए सरकारच्या काळाचा उल्लेख करताना मोदी म्हणाले कि , “एक काळ होता जेव्हा बदल करण्यासंबंधी खूप चर्चा व्हायची. काही वेळा दबावात किंवा इच्छा नसतानाही निर्णय घेत बदल करण्यात आल्याचं सांगितलं जायचं. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आम्ही धोरणात्मक बदलाला महत्त्व दिलं आहे. प्रत्येकाचा दुसऱ्याशी संबंधही असला पाहिजे याकडे लक्ष देत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “गेल्या काही वर्षात अनेक कायदे रद्द करण्यात आले. सहज व्यवसाय करण्यामध्ये भारत आता ६३ व्या क्रमांकावर आला आहे. यामागे कऱण्यात आलेले अनेक बदल कारणीभूत आहेत. यामुळे परदेशी गुंतवणूकदरांचा विश्वास वाढत आहे. करोना संकटातही रेकॉर्ड गुतंवणूक होणं याचंच उदाहरण आहे”.

पारदर्शक करप्रणालीसाठी एक नवं व्यासपीठ तयार करण्यात आलेलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. (Transparent Taxation : Honouring the Honest) असं या व्यासपीठाचं नाव आहे. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणाऱ्यांच्या मनातील भीती दूर होईल असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. तसंच देशवासियांना कर भरण्याचं आवाहन केलं आहे. ही नवी करप्रणाली आजपासून लागू होणार असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

काय असेल हि प्रणाली ?

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि , कर प्रणाली सुटसुटीत आणि जलद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे . या पूर्वीच्या सरकारांनी असे प्रयत्न कधीही केले नाही. नीती आधारित कोणत्याही सुधारणा झाल्या नाहीत. सुधारणा हि निरंतर होणारी प्रक्रिया आहे. या पार्श्वभूमीवर आज पासून  फेसलेस असेसमेंट, फेसलेस अपील, टॅक्स चार्टर लागू करण्यात येत आहे. देशात सुधारणांचे नवे पर्व सुरु झाले असल्याचे सांगून  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि ,  पेनलेस , फेसलेस असेसमेंट, फेसलेस अपील, टॅक्स चार्टरमुळे करदाते आणि कर अधिकारी यांच्यातील संपर्क खंडीत, पारदर्शक प्रणाली होणार असून यामुळे तंत्रज्ञानाचा कुशल वापर करून कर प्रणाली अधिक प्रभावीपणे काम करेल.  प्रत्येकाला आपल्याला जबाबदारीने काम करावं लागेल. हि प्रणाली  टॅक्सपेअर चार्टर करदाते आणि सरकारमधील नातेसंबध दृढ करण्यासाठी आयकर विभागाला करदात्याचा मानसन्मान ठेवावा लागेल. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागेल. करदात्यांना काही संशय असेल तर दाद मागण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे.

देशातील प्रामाणिक करदाता देशाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावतो. प्रामाणिक करदात्यासोबत देशाचाही विकास होत असतो. आज प्रत्येकाला शॉर्टकट योग्य नसल्याचं लक्षात येत आहे. चुकीचे मार्ग निवडणं योग्य नाही. ती वेळ, काळ निघून गेला आहे. देशभरात नवे बदल होत आहेत. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणाऱ्यांच्या मनातील भीती दूर होईल,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
ज्या शहरात आपण राहतो तेथील कर विभाग आपल्या सर्व गोष्टी हाताळतो असं होतं. या नव्या व्यासपीठामुळे कर अधिकाऱ्याची भूमिका बदलली आहे. जर मुंबईमधील एखाद्या व्यक्तीचं करसंबंधी प्रकरण असेल ते मुंबईमधील अधिकारीच हाताळेल असं होणार नाही. ते चेन्नई किंवा इतर शहरातही जाऊ शकते. यामागे फेसलेस टीम असेल. ही टीम कोणती असेल याचा निर्णय संगणक निवड करेल तीच असेल,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

आपल्या सरकारच्या काळातील कर प्रणालीच्या बदलाविषयी बोलताना मोदी म्हणाले कि , “करदात्यांच्या प्रत्येक पैशाचा योग्य वापर करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. सरकारलाही करदाता जागरुक राहतील अशी अपेक्षा आहे. २०१२-१३ मध्ये ०.९४ टक्के छाननी होत होती, २०१८-१९ मध्ये हा आकडा ०.२६ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच छाननी होण्याचं प्रमाण जवलळपास चार पटीने कमी झालं आहे. याचा अर्थ बदल किती व्यापक आहे हे दर्शवत आहे. गेल्या सहा ते सात वर्षात टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या अडीच कोटींनी वाढली आहे. पण १३० कोटींच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही वाढ फार कमी झाली आहे. १३० कोटींपैकी फक्त दीड कोटी लोक कर भरत आहेत. यावर आपण सर्वांनी चिंतन करणं गरजेचं आहे. आपलं आत्मचिंतनच आत्मनिर्भर भारतासाठी गरजेचं आहे”.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!