Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : मोठी बातमी : गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 413 जणांचा मृत्यू , आज 11 हजार 813 नवे रुग्ण तर तर 9 हजार रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

राज्यात आज पहिल्यांदाच सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 413 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 3.4 टक्के एवढा असून तो देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्यात आज 11 हजार 813 नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 5 लाख 60 हजार 126 एवढी झाली आहे. राज्यात आज नऊ हजार 115 रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत एकूण 3 लाख 90 हजार 958 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.8 टक्के इतका आहे.

राज्यात आज दहा लाख 25 हजार 660 व्यक्ती घरात विलगीकर मध्ये आहेत, तर 36 हजार 450 संस्थात्मक विलगीकरण आहेत. राज्यात एकूण एक लाख 49 हजार 798 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 23 लाख 96 हजार 638 झाला आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्डब्रेक 66 हजार 999 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात ही सर्वाधिक रुग्णांची आकडेवारी आहे. याआधी 8 ऑगस्ट रोजी 65 हजार 156 नवी रुग्ण सापडले होते. तर, एका दिवसात 942 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 6 लाख 53 हजार 622 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 47 हजार 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 लाख 95 हजार 982 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात शहरासह ग्रामीण भागांतही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आज देखलील मोठ्या संख्येनं बाधित रुग्ण आढळले आहेत. आत 11 हजार 813 नवीन रुग्ण आढळल्यानं राज्यातील एकूण रुग्णसंख्या 5 लाख 60 हजार 126च्या घरात पोहोचली आहे. तर, मुंबई महापालिका हद्दीत 1 हजार 200 रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. राज्यात सध्या 10 लाख 25 हजार 660 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, 36 हजार 450 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात आज 413 करोना मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळं एकूण करोना मृतांचा आकडा आता 19 हजार 063 वर पोहोचला आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर 3.4 इतका झाला आहे. आज नोंद झालेल्या 413 कोरोनामृत्यूंपैकी 288 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 74 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 51 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे 51 मृत्यू ठाणे जिल्हा-31, जळगाव-4, पुणे-3, नाशिक-3, पालघर-3, लातूर-2, उस्मानाबाद-2, रायगड-1, वाशिम-1 आणि औरंगाबाद-1 असे आहेत.

राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी रुग्ण बरे होण्याचा दरही वाढत आहे. आज 9 हजार 115 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 3 लाख 90 हजार 958 रुग्णांनी करोनाची लढाई यशस्वी जिंकली आहे. त्यामुळं राज्यातील रिकव्हरी रेट 69.8 टक्के इतका झाला आहे. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 29 लाख 76 हजार 090 चाचण्यांपैकी नमुन्यांपैकी 5 लाख 60 हजार 126 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!