Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : कंपनीचे प्रॉडक्ट खरेदीवर नफा देण्याचे आमिष , चौघांना पाच लाखांचा कंपनीचा गंडा

Spread the love

दहा जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल, देशभरात  विहान डायरेक्ट सेलिंग विरुध्द १८गुन्हे दाखल

क्यूनेट मार्केटिंग च्या विहान डायरेक्ट सेलिंग प्रा.लिमिटेडने एका हॉटेलात सेमिनार आयोजीत करुन दोन ते दहा लाखांपर्यंतचे प्रॉडक्ट साखळी पध्दतीने विक्री केल्यास आकर्षक नफा देण्याचे आमिष दाखवून कंपनीच्या दहा जणांनी चौघांना चार लाख ९७ हजारांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासानंतर वेदांतनगर पोलिसात दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच विहान डायरेक्ट सेलिंग विरुध्द देशभरात १८गुन्हे दाखल असून विहान डायरेक्ट सेलिंग यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे.अशी माहिती पोलिस तपासात उघंड झाली आहे.


क्यू नेट ही जगातल्या विविध देशात डायरेक्ट सेल मार्केटिंग करणारी कंपनी असून भारतामधे क्यू नेटवर बॅन आहे म्हणून क्यू नेट ने विहान डायरेक्ट सेलिंग प्रा लिमिटेड नावाने कंपनी सुरु केली आहे. याच विहान डायरेक्ट सेलिंग विरोधात आर्थिक गुन्हेशाखेकडे २०१९ला तक्रार आली होती.पण लाॅकडाऊनमुळे तपासाला उशीर झाल्याचे वरिष्ठ सुत्रांनी सांगितले.

पहाडसिंगपुरा भागातील कल्याण झिंगराव इंगळे (२९, रा. ए. बी. हाईट, रो-हाऊस क्र. ५) हा तरुण कोलकाता येथील अल्टियस बायोेजेनिक कंपनीचा मराठवाडा व्यवस्थापक आहे. त्याची विहान डायरेक्ट सेलिंग ची मार्केटींग करणारा ज्ञानेश्वर उर्फ अंकुश गुलाबराव रिंडे (रा. बालाजीनगर) याच्याशी सन २०१६ मध्ये ओळख झाली. त्याने क्यू-नेट या कंपनीत व्यवसाय केल्यास चांगला नफा मिळतो असे सांगितले. त्यानंतर त्याने औरंगाबाद विभागाचे काम पाहणा-या रोहित देशपांडे याच्याशी ओळख करुन दिली. १६ आॅक्टोबर २०१७ रोजी रोहित देशपांडे याने क्रांतीचौकातील हॉटेल मेनॉरमध्ये बोलावून घेतले. यावेळी धनंजय देशपांडे याचीही भेट झाली. धनंजय देशपांडेने मुलाखतीसाठी येणारे रोहित देशपांडे हे कंपनीतील मोठी व्यक्ती आहे. कंपनीतील व्यवसायामुळे ते श्रीमंत झाले आहेत. कंपनीकडे कॉस्मोटीक क्रिम, इलेक्ट्रॉनिक, टुरिझम, वॉचेस व ज्वेलरी अशी खूप काही प्रॉडक्टस आहेत. कंपनीचे प्रॉडक्टस खरेदी केल्यास पॉईंट मिळतील त्यावरुन नफा दिला जाईल असे सांगितले. त्यानंतर तेथे आलेल्या रोहित देशपांडेने प्रॉडक्टबाबत माहिती दिली. कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी केल्यावर १४ टक्के रकमेचा नफा मिळेल. त्यातूनच टीडीएस सुध्दा वजा होईल असेही सांगितले. जसा कंपनीचा व्यवसाय वाढेल तसा नफा देखील वाढेल. तसेच ही कंपनी मलेशियातील असून, कंपनीचा सर्व व्यवहार आॅनलाईन होतो  असे सांगून रोहित देशपांडे निघून गेला. पुढे २७ आॅक्टोबर २०१७ रोजी इंगळेने दोन लाख ७१ हजाराचा डीडी विहान डायरेक्ट सेलिंग प्रा. लि. या कंपनीच्या नावे दिला. त्यावर त्याला दोन लाख वीस हजारांचे टुरिस्ट प्रॉडक्ट देण्यात आले. त्यानंतर कंपनीच्या ग्रुपमधील ऋुता देशपांडे, रोहित देशपांडे, अजिंक्य कवटेकर, अक्षय कुलकर्णी, सारंग लाहुलकर, गिरीश कुलकर्णी व धनंजय देशपांडे यांनी वेगवेगळ्या तारखेला मेनॉर हॉटेलात बैठका घेतल्या.

…….

इंगळेंच्या मार्फत इतरांची गुंतवणूक….

डिसेंबर २०१७ मध्ये इंगळेच्या सासू कलावती वाघ यांनी रिंडेला दोन लाख वीस हजार रुपये कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी दिले. त्यावेळी कंपनीत भागीदार झालेल्या वाघ यांना देखील टुरिस्ट प्रॉडक्ट देण्यात आले. याच महिन्यात साली जया वाघ हिने देखील रिंडेला एक लाख साठ हजाराची रोकड दिली. जानेवारी २०१८ मध्ये मित्र प्रशांत अंभोरे (रा. धानोरा, ता. जि. वाशीम) याने इंगळेच्या क्रेडिट कार्डवरुन एक लाख दहा हजार रुपये रिंडेला कंपनीचे प्रॉडक्ट खरेदीसाठी दिले. त्यानंतर इंगळेला तुझ्या मार्फत भागीदार झाल्याने रोहित देशपांडे याने कंपनीकडून चार पॉईंट मिळाले आहे असे सांगितले. त्यानुसार कंपनीकडून सारंग आणि अक्षय यांनी वेळोवेळी रोख स्वरुपात एकुण ४४ हजार रुपये दिले. काही दिवसांनी कंपनी म्हणून सांगत आमिष दाखवणे, खोटी आश्वासने देणे व भुरळ पाडून लोकांची फसवणूक करणे असे इंगळेच्या लक्षात आले.

………

नफा होत नसल्याचे लक्षात आले…..

या व्यवसायात नफा होत नसल्याचे लक्षात आल्यावर इंगळेने मित्र रिंडे व कंपनीचा रोहित देशपांडे यांच्याकडे पैसे परत मागितले. मात्र, त्यांनी कंपनीत गुंतविलेले दोन लाख ७१ हजार रुपये देण्यास नकार दिला. आतापर्यंत ५ लाख ४१ हजार रुपये इंगळेने कंपनीत गुंतविले होते. त्यामोबदल्यात त्याला फक्त ४४ हजार रुपये कंपनीने दिले होते. तर कंपनीने दिलेले प्रॉडक्ट फसवे असल्याचे उघडकीस आले. त्यावरुन जाब विचारताच पैसे देण्यास नकार देत कंपनीच्या सदस्यांनी तुला काय करायचे ते करु शकतो अशा धमक्या दिल्या. अशाच पध्दतीने शिवकुमार प्रकाश पवार, सुमीत हिरालाल बंडे (दोघेही रा. सातारा परिसर) आणि शांतीनाथ भाऊसाहेब ढाकणे (रा. लिंगदरी, चौका) यांची फसवणूक केली. तर एजंट रामेश्वर झिने व विशाल समिंद्रे यांनी देखील इतर साथीदारांच्या मदतीने फसवणूक केल्याचे समजते. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!