IndiaNewsUpdate : Viralvideo : मुस्लिम तरुणांनी मानवी साखळी तयार करून मंदिराला दिले दंगलीत दिले संरक्षण !!

Spread the love

बंगळुरूमध्ये मंगळवारी रात्री  भडकलेल्या जातीय हिंसाचाराचा फटका मंदिराला  बसू नये म्हणून मुस्लीम तरुणांनी या मंदिरासमोर मानवी साखळी तयार केली, आणि मंदिराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्यापासून वाचवले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या 19 सेकंदाच्या व्हिडीओ पाहून लोकं या तरुणांचे कौतुक करत आहेत.

व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की हिंसक जमाव मंदिरालाच्या दिशेने येत असताना काही मुस्लीम तरुणांना मंदिरासमोर मानवी साखळी तयार करण्यात सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये हे तरुण जमावाला, “अल्लाहसाठी तरी हे करू नका”, असे सांगताना ऐकू येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी मी आमदाराचा पुतण्या असल्याचं सांगणाऱ्या नवीन नावाच्या एका युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता माझं फेसबूक अकाऊंट हॅक झाली असल्याची माहिती त्याने दिली. मी कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केली नसल्याचं नवीनने पोलिसांना सांगितलं.

दरम्यान, यात अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह 60 पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यामुळे बेंगळुरूमध्ये सीआरपीसीचा कलम 144 लागू करण्यात आला आहे तर या प्रकरणी आतापर्यंत 110 लोकांना अटक करण्यात आली आहे. उत्तर बंगळुरुच्या पुलकेशी नगर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे आमदार खंड श्रीनिवास मूर्ती यांच्या पुतण्याने  प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी सोशल मीडियावर एक अपमानास्पद पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला. यानंतर या भागात गोळीबारही झाला. या गोळीबारात 2 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. यावेळी हिंसक जमावाने एका मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता त्या मंदिराच्या भोवती मुस्लिम तरुणांनीच साखळी तयार करून मंदिरांना लक्ष न करण्याचे आवाहन केले.

आपलं सरकार