Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यांगी यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन, “काँग्रेसने अपना बब्बर शेर खो दिया…” : राहुल गांधी

Spread the love

काँग्रेस प्रवक्ते आणि नेते राजीव त्यांगी यांचे आज कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं असल्याचं वृत्त आहे . राजीव त्यागी यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना त्याच परिस्थितीत गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आआले होते परंतु उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.  वास्तविक सकाळपासून त्यांची प्रकृती चांगली होती. याव्यतिरिक्त संध्याकाळी पाच वाजता त्यांनी एका हिंदी खासगी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. परंतु त्यानंतर घरी अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वढेरा यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी “काँग्रेसने अपना बब्बर शेर खो दिया…” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

राजीव त्यागी यांच्या निधनानंतर काँग्रेससह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेसने ट्विट करून म्हटले आहे कि, “राजीव त्यागी यांच्या निधनामुळे आम्हाला दु:ख झालं आहे. ते एक पक्के काँग्रेसी आणि खरे देशभक्त होते. या कठिण काळात आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत,” असं काँग्रेसनं म्हटलं आहे.   त्यांच्यासोबत अनेकदा टीव्हीवरील डिबेटमध्ये सहभागी असणारे संबित पात्रा यांनीदेखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. “काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी हे माझे मित्र आज आमच्यासोबत नाहीत यावर विश्वासच बसत नाही. आज पाच वाजता आम्ही एका डिबेटमध्ये एकत्र होते. आपलं जीवन अनिश्चित आहे. माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत,” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!