CoronaVaccineUpdate : रशियाच्या पहिल्या लसीवर काय होते आहे चर्चा ? तुम्हाला हे माहित आहे काय ? जगात १६५ लसीवर होत आहे संशोधन…

Spread the love

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी दोन करण्यात मग्न असताना दुसरीकडे या विषाणूला काबूमध्ये आणण्यासाठी प्रत्येक देश कोरोनवर लस शोधण्यासाठी परिश्रम घेत आहे. दरम्यान कोरोनाला अटकाव करणारी लस शोधली असल्याची घोषणा रशियाने केल्यानंतर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.  रशियाच्या या घोषणेनंतर जागतिक आरोग्य संघटनेचीही  प्रतिक्रिया आली असून जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या लशीला मंजुरी दिली जाईल असे सांगितले. मात्र, त्यासाठी रशियाला काही प्रक्रियांचे पालन करावे लागणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. जगात सध्या जवळपास १६५ लसीवर संशोधन सुरू आहे. त्यातील १३९ लशी ह्या अजूनही प्री-क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहेत. तर, २६ लशी या मानवी चाचणीच्या विविध टप्प्यात आहे. तर, सहा लशी ह्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत.


जिनिव्हात झालेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते तारिक जासारेविक यांनी सांगितले की, आम्ही रशियाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. रशियाने विकसित केलेल्या करोना लशीच्या प्री-क्वालिफिकेशनबाबत आमची चर्चा सुरू आहे. यामध्ये कोणत्याही आजाराशी संबंधित लशीच्या प्री-क्वालिफिकेशनसाठी सक्तीची समिक्षा आणि सर्व प्रकारची सुरक्षिता आणि प्रभावी मानकांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत बोलताना जासारेविक पुढे म्हणाले कि , प्रत्येक देशामध्ये एक नियामक प्राधिकरण असते. या प्राधिकरणाकडून लस, औषधाला मान्यता दिली जाते. जागतिक आरोग्य संघटनेकडे लस आणि औषधांसाठी प्री-क्वालिफिकेशन प्रोसेस आहे. उत्पादकही जागतिक आरोग्य संघटनेकडून प्री-क्वालिफिकेशनची मागणी करतात. ही सुरक्षितेची एक खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

‘स्पुटनिक व्ही’ आहे तरी काय ?

रशियाने करोनावरील लशीला ‘स्पुटनिक व्ही’ असे नाव दिले आहे. ‘स्पुटनिक’ हा समाजवादी सोव्हिएत रशियन महासंघाने अवकाशात सोडलेला जगातील पहिला उपग्रह होता. त्यानंतर आता रशियाने करोनाला अटकाव करणारी जगातील पहिली लस विकसित केली आहे. रशियन लस ‘स्पुटनिक’ ही गमालोया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्तरीत्या विकसित केली आहे. जगात सध्या जवळपास १६५ लशींवर संशोधन सुरू आहे. त्यातील १३९ लशी ह्या अजूनही प्री-क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहेत. तर, २६ लशी या मानवी चाचणीच्या विविध टप्प्यात आहे. तर, सहा लशी ह्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. गमालेयाची लशीचा समावेश २६ लशींच्या यादीत असून फेज १ मध्ये समावेश आहे.

दरम्यान  रशियन लशीचे औद्योगिक उत्पादन सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात येणार आहे. तर, २० देशांनी एक अब्ज डोसची नोंदणी केली असल्याची माहिती रशियाने दिली आहे. रशियाने कोरोना विरोधातली लस शोधली, त्यासंदर्भातला दावाही केला. इतकंच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी स्वतःच्या मुलीवर चाचणी घेतल्यानंतर  या लसीला मंजुरी दिल्याची माहिती दिली. करोनाविरोधात लस शोधणारा रशिया हा पहिला देश ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत. मात्र या लसीविरोधात आता काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

रशियन लसीवर आक्षेप काय आहेत ?

कोरोनावरील या लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्या इन्स्टिट्युटने अद्याप दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांची संख्या जाहीर केलेली नाही. लस शोधताना हे दोन टप्पे अत्यंत महत्त्वाचे आहेत. शोधण्यात आलेली लस किती सुरक्षित आहे? हे या दोन टप्प्यांमध्ये तपासलं जातं. WHO चं म्हणणं हे आहे की रशियाने जी लस शोधली आहे त्यासंबंधी पहिल्या टप्प्यात जी चाचणी झाली त्याचेच आकडे आहेत. WHO ने रशियाला विनंती केली आहे की जे नियम लसीसाठी घालून देण्यात आले आहेत ते पूर्ण केले पाहिजेत. रशियाने जी लस तयार केली आहे त्याबाबत काहीशी चिंता वाटते आहे. ही लस फक्त असुरक्षितच नाही तर परिणाम न साधणारीही असू शकते असं म्हणत लॉरेन्स गॉस्टिन यांनीही चिंता व्यक्त केली आहे. गॉस्टिन हे जॉर्जटाउन विद्यापीठातले ग्लोबल पब्लिक हेल्थ एक्स्पर्ट म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यान संसर्ग रोगांची जाण असलेले आणि त्यामध्ये तज्ञ असलेले अमेरिकेतील डॉक्टर अँथोनी फौसी यांनीही रशियाच्या लसीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. इतक्या जलदगतीने त्यांनी करोनावरची लस कशी काय तयार केली? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. इतकंच नाही तर रशिया आणि चीनमध्ये लोकांना लस दिली जाते आहे. मात्र त्याबाबत सुरक्षेची काळजी घेतली जात नाही असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे रशियाने जलद गतीने समोर आणलेल्या या लसीबाबत आता प्रश्न विचारले जात आहेत.

आपलं सरकार