Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वडिलांच्या संपत्तीत मुलीला मिळणार सामान वाटा , सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Spread the love

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या वडिलांच्या संपत्तीत  मुलाप्रमाणे मुलीलाही वाटा  समान वाटा मिळेल, असा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.  या विषयावरून  बराच  काळ वाद सुरू होता. पण, आता अखेर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणावर  शिक्कामोर्तब करताना यापुढे वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीलाही सामान वाटा मिळेल असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा कायदा प्रत्येक परिस्थितीत लागू होईल असा निर्णय ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निकाल आज  दिला आहे.

२००५ मध्ये आपल्या पित्याच्या  मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावा प्रमाणे समान वाटा मिळेल, असे  अधिनियमित केले गेले होते. त्यानुसार, मुलगा व मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर समान हक्क मिळतील असे आदेशित करण्यात आले होते परंतु, हा कायदा  2005 पूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असेल त्यांना याचा लाभ मिळेल की नाही हे स्पष्ट नव्हते. वडिलांच्या संपत्तीचे वाटप होत असताना वडील हयात असतील किंवा निधन झाले असेल तरीही मुलीला मुलाप्रमाणेच समान वाटा मिळाला पाहिजे, असे  कोर्टाने स्पष्ट केले आहे. जस्टिस मिश्रा आपल्या आदेशात म्हणाले की, ‘प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वाटा मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मुलीला समान वाटा हा दिलाच पाहिजे. मुलाचे लग्न होत नाही तोपर्यंत तो मुलगा असतो. पण, मुलगी ही कायम मुलगीचं असते’ मुलीला 1956 च्या कायद्यानुसार हिस्सा मिळणार होता. पण  2005 सालात केंद्र सरकारने यात बदल केला. मात्र, त्यात 2005 सालानंतर ज्या मुली जन्मतील त्या मुलींना समान हिस्सा मिळणार असा बदल करण्यात आला.  आता हा मुद्दा कायमचा वगळण्यात आला आहे. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत आपला वाटा मागण्याचा अधिकार मुलींना प्राप्त झाला आहे.

दरम्यान मुलींना वडिलोपार्जित संपतीत वाटा मिळण्याबाबत हिंदू वारसा हक्क कायदा-1956 हा कायदा होता. या कायद्यानुसार, वडिलांच्या संपत्तीत मुलीला वगळून वाटणी व्हायची. त्यानंतर वडिलांना जो वाटा मिळाला असेल त्यांची पुन्हा मुलांच्या संख्येनुसार वाटणी व्हायची आणि त्यात सर्व मुलांना समान हिस्सा मिळायचा. 1994 सालात कायद्यात चार राज्यात बदल करण्यात आला. 1994 सालानंतर ज्या मुलींचं लग्न झालं आहे, त्यांना वडिलांच्या संपत्तीत समान हिस्सा मिळेल, अशी तरतूद केली होती आणि ज्या मुलींची लग्न 1994 सालाच्या आधी झालं त्यांना हा कायदा लागू होता . आता या संपूर्ण कायद्यात बदल करण्यात आला असून मुलीला समान वाटा मिळणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!