IndiaNewsUpdate : यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी  यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही

Spread the love

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी  यांच्यावर काल दि. १० ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्या मेंदूत असलेली एक गाठ या शस्त्रक्रियेत  यशस्वीरीत्या काढण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नाही असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना दिल्लीतील आर्मी रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान प्रणव मुखर्जी यांच्यावर आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या मेंदूमध्ये एक गाठ होती. यामुळे डॉक्टरांना त्यांच्यावर सर्जरी करावी लागली. ही सर्जरी यशस्वी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ८४ वर्षीय प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच एएनआयने दिलेल्या माहितीनुसार प्रणव मुखर्जी यांच्या तब्बेतीत कोणतीही सुधारणा अद्याप झालेली नाही. त्यांची तब्बेत बिघडली आहे. त्यांच्या मेंदूत एक गाठ झाली होती. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसंच त्यांना कालच करोनाचीही लागण झाली आहे. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे. प्रणव मुखर्जी हे अद्याप व्हेंटिलेटवरच आहेत.

आपलं सरकार