Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ६०१ नवे करोनाबाधित , ८७१ जणांचा मृत्यू

Spread the love

देशभरात मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ६०१ नवे करोनाबाधित आढळले व ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ वर पोहचली आहे.देशातील २२ लाख ६८ हजार ६७६ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ३९ हजार ९२९ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले/डिस्चार्ज मिळालेले/स्थलांतरित १५ लाख ८३ हजार ४९० जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४५ हजार २५७ जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. देशात आता अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण २८.२१ टक्के, करोनामुक्त झालेले/डिस्चार्ज मिळालेले/स्थलांतरित अशांचे प्रमाण ६९.८० टक्के व मृत्यू झालेल्यांचे प्रमाण १.९९ टक्के आहे. भारत सरकारच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!