SushanSingRajputAndDishaDeathCase : माध्यमांचं चाललंय काय ? टीआरपीसाठी वाट्टेल ते , मुंबई पोलीस म्हणाले ” हे खरे नाही…!! “

Spread the love

बहुचर्चित अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबरोबरच त्याची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूवरूनही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. भाजपाचे नेते नारायण राणे यांनी दिशा सालियानची बलात्कार करून हत्या केल्याचा दावा केला होता. त्यापाठोपाठ काही माध्यमांनी दिशाचा मृतदेह नग्नावस्थेत सापडल्याचं वृत्त दिल्यानं खळबळ उडाली. मात्र, या वृत्तानंतर मुंबई पोलिसांनी याविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केल्याची घटना आठ जून रोजी समोर आली होती. आत्महत्येनंतर ११ जून रोजी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यावरून बऱ्याच शंका आणि आरोप केले जात आहे. अशात काही माध्यमांनी दिशा सालियानचा मृतदेह नग्नावस्थेत सापडल्याचं वृत्त दिलं होतं. हे वृत्त फेटाळून लावत मुंबई पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे.

या सर्व प्रकरणात तपास करता , करता पोलिसांच्या नाकी नऊ आले आहेत . यावर माध्यमातूनही अनेक निराधार बातम्या प्रसृत करण्यात येत आहेत त्यामुळे पोलिसांना आणि मृतांच्या कुटुंबियांना माध्यमे म्हणजे मोठी डोकेदुखी झाली आहे . मुंबई पोलिसांनी म्हटले आहे कि , “दिशा सालियानचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याची बातमी चुकीची आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी दिशाचे पालकही घटनास्थळी होते. दिशानं तिची मैत्रीण अंकिताला शेवटचा फोन केला होता, तिचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत २०-२५ लोकांची साक्ष नोंदवण्यात आली आहे,” अशी माहिती मुंबई झोन ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी ही माहिती दिली. माध्यमांनी शवविच्छेदन अहवालानुसार वृत्त दिलं होतं की, दिशा सालियानचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार दिशा सालियाननं आत्महत्या करण्यापूर्वी जवळपास ४५ मिनिटं फोनवर बोलत होती.

आपलं सरकार