Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaUpdate : फेसबुक आणि पोलिसांनी अशी जलद कामगिरी केली कि तुम्हीही म्हणाल…” शाब्बास फेसबुक आणि पोलीस…!! “

Spread the love

सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा काळ असल्याने लोक सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे झाके पर्यंत सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. फेसबुक उघडताच यूजर्सना फेसबुककडून “What’s on your mind” असा प्रश्न विचारला जातो त्यामुळे अनेक यूजर्स फेसबुकवरून आपले सुख दुःख आपल्या मित्रांना शेअर करून आपले मन हलके करतात . अर्थात या सर्व हालचालींवर फेसबुकचे बारीक लक्ष असते हेच पुन्हा एकदा उघड झाले आहे.  शनिवारी असाच एक प्रकार घडला ज्यात आयर्लंड येथील फेसबुक कार्यालयातून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दिल्ली सायबर विभागाचे डीसीपी अनयेश रॉय यांना फोन गेला, त्यात त्यांना सांगण्यात आले कि , अमुक एक व्यक्ती आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. आणि दिल्ली सायबर विभागानेही हलगर्जीपण न करता तितक्याच तत्परतेने सर्व सूत्रे  हालवली.

फेसबुककडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मोबाईल क्रमांक दिल्लीतील रहिवाश्याचा असून तो पूर्व दिल्लीत राहत असल्याचे सांगण्यात आले. दिल्ली सायबर विभागाने पूर्व दिल्लीतील पोलिसांना डीसीपी जसमित सिंग यांना ही माहिती दिली. त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीच्या घरी जाऊन चौकशी केली तेंव्हा हा नंबर वापरणारी व्यक्ती मुंबईत आहे, पण हा नंबरआपल्या नावावर असल्याची माहिती त्याच्या बायकोने दिली. तिचा पती मुंबईत शेफ म्हणून काम करतो, पण कुठे राहतो ह्याची माहिती तिला ही नव्हती. या दाम्पत्याला नुकतेच बाळ बाळ झाले होते दरम्यान त्याचा पत्नीशी त्याचा वाद देखील झाला होता. म्हणून 15 दिवसांपूर्वी तो मुंबईत परत आला होता. त्याच्या बायकोकडून मिळालेली माहिती दिल्लीच्या सायबर विभागाने मुंबईतील सायबर विभागाला त्वरित कळवली. दरम्यान मुंबई सायबर विभागाच्या डीसीपी डॉ. रश्मी करंदीकर आणि त्यांच्या टीमने त्या व्यक्तीशी संपर्क करण्याचे प्रयत्न केले. त्याचा फोन बंद होता,  मात्र त्याच्या आईच्या माध्यमातून वॉट्सअप वर संपर्क होतो का ? याबाबत पोलिसांनी  प्रयत्न केला तेंव्हा त्या व्यक्तीने मध्येच फोन सुरू केला  तेव्हा सायबर पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्याचे लोकेशनत ट्रेस केले तेंव्हा  तो भाईंदर येथे असल्याची माहिती  भाईंदर पोलिसांना देण्यात आलीआणि पाहता पाहता सायबर पोलीस आणि भाईंदर पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. नोकरी गेली, त्यात बाळ झाले, आर्थिक जबाबदारी आणि पत्नीशी वाद त्यामुळे याच निराशेतून तो टोकाचे पाऊल उचलणार होता. पण पोलिसांनी वेळेत त्यांच्यापर्यंत पोहचून त्याला समजावले. त्याला आत्महत्या करण्यापासून वाचवण्यात यश मिळवले.

थोडक्यात बातमी अशी कि , फेसबुकवर आत्महत्येबाबत त्या व्यक्तीने केलेला “सर्च” !! . यामुळे अलर्ट झालेल्या फेसबुकने दिल्ली सायबर विभागाला कळवलं आणि दिल्ली पोलिसांनी मुबई पोलिसांना. आणि संध्याकाळी साडेसात वाजता सुरू झालेले हे शोधनाट्य पहाटे तीनच्या सुमारास थांबले. ठरवले तर पोलीस काय करू शकतात याचे हे उदाहरण आहे. या आधीही पोलिसांनी ऑनलाईन मीडियावरून माहिती मिळताच अनेक आत्महत्या थांबवल्या असल्या तरी फेसबुकच्या आणि पोलिसांच्या समन्वयातून थांबलेली हि कदाचित पहिलीच आत्महत्या असावी. शाब्बास पोलीस आणि शाब्बास फेसबुक !!!

आपलं सरकार

Click to listen highlighted text!