IndiaCrimeUpdate : संतापजनक : गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा , अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणारा शिक्षक गजाआड

Spread the love

महिला आणि बालकांच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात कितीही कठोर कायदे केले तरी समाजातील काही लोकांची विकृती काही केल्या कमी होत नाही हेच सातत्याने स्पष्ट होत आहे. असे घृणास्पद कृत्य करणारांना अनेकदा वय  आणि नात्याचेही भान राहत नाही अशीच गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना प्रयागराजमध्ये घडली आहे. येथील एका खासगी शाळेतील शिक्षकाने आठवीतील विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी धूमनगंज पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार केली असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास चालू आहे.

याविषयीची अधिक माहिती अशी कि , धूमनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत बमरौली परिसरात खासगी शाळेत मुलगी शिकते. याच शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनुसार, ट्युशन घेण्याच्या बहाण्याने या शिक्षकाने मुलीचे लैंगिक शोषण केले. आरोपी शिक्षक बृजेश हा मूळचा गाझीपूरचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो या शाळेत शिकवतो. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सांगण्यावरून शाळेतच तो मुलांचे ट्युशन घेतो, असे सांगण्यात येत आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापनानेही त्याच्याविरोधात कारवाई केली आहे. त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पीडित मुलीच्या आईवडिलांनी शिक्षकाविरोधात तक्रार केली आहे आणि त्या आधारे शाळा व्यवस्थापनाने त्याला निलंबित केले आहे, असे शाळेच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

आपलं सरकार