Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaWorldUpdate : तुम्हाला हे माहित आहे काय ? जगाच्या पाठीवर असा एक देश आहे , जेथे गेल्या तीन महिन्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही…

WELLINGTON, NEW ZEALAND - JUNE 08: Prime Minister Jacinda Ardern speaks to media during a post cabinet press conference at Parliament on June 08, 2020 in Wellington, New Zealand. Prime Minister Jacinda Ardern announced that New Zealand will move to COVID-19 Alert Level 1 at midnight on June 8. Alert Level 1 will see people return to work, school, sports events and domestic travel without restrictions. There will also no longer be any restrictions on numbers at mass gatherings. Controls at the borders will remain in place for all people entering New Zealand, including health screening and testing for all arrivals, and mandatory 14-day managed quarantine or isolation. There are no longer any active cases of COVID-19 in New Zealand. (Photo by Hagen Hopkins/Getty Images)

Spread the love

चीनच्या वुव्हान पासून सुरु झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण जग भयभीत झाले आहे. या भीतीदायक विषाणूशी  लढताना  सातत्याने लॉकडाऊन करावा लागल्याने जगातील अनेक देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे परंतु या पार्श्वभूमीवर अशातच न्यूजीलँड या देशाने जगासमोर एक आदर्श  निर्माण केला आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनमध्ये कडक नियम आखत कोरोनाला नियंत्रणात आणले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या लेडी पंतप्रधानांचं जगभरात  कौतुक होत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत   या देशात आंतरराष्ट्रीय प्रवास  करणाऱ्यांची संख्या अधिक असून त्यांना परदेशातून परतताना सीमेवरच थांबवून क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येत आहे. याउलट प्रारंभीच्या काळात भारतसह इतर अनेक देशात आलेल्या प्रवाशांची तपासणी न करताच देशात प्रवेश देण्यात आला त्याचा परिणाम असा झाला कि , सर्वत्र कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

उपलब्ध माहितीनुसार या देशात गेल्या तीन महिन्यात एकही कोरोना रुग्णाची नोंद झालेली नाही. न्यूझीलँडमध्ये  मार्च महिन्याच्या शेवटी लॉकडाऊन अत्यंत कडक केला होता. यातून संसर्ग नियंत्रणात आणणे शक्य झाले. त्यावेळी देशात केवळ 100 जणांना संसर्ग झाला होता. दरम्यान देशात रविवारीही कोरोना संसर्गाची  एकही नोंद झालेली नाही. तर गेल्या तीन महिन्यात एकही रुग्ण संक्रमित झालेला नाही. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यात या देशात आंतरराष्ट्रीय प्रवास  करणाऱ्यांची संख्या अधिक असून त्यांना परदेशातून परतताना सीमेवरच थांबवून क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविण्यात येत आहे.

याबाबत बोलताना ‘यूनिवर्सिटी ऑफ ओटागो’ मध्ये साथीरोगाचे  तज्ज्ञ प्रोफेसर माइकल बेकर यांनी सांगितले, हे चांगल्या राजकीय नेतृत्व व विज्ञानाच्या योग्य वापरामुळे शक्य झाले. जर तुम्ही ज्या देशांनी कोरोनाला नियंत्रणात आणलं त्यांचा विचार कराल तर या दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. न्यूजीलँडच्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं जात आहे. लॉकडाउनमध्ये त्या जनतेला दररोजच्या परिस्थितीची माहिती देत होत्या. आणि कडक नियम लागू केले होते. या देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1500 इतकी आहे. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!