CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक : राज्यातील रुग्णांचा बरे होण्याचा दर ६८ टक्क्यांच्या वर , दिवसभरात १३ हजार रुग्णांना डिस्चार्ज ….

Spread the love

राज्यात आज पुन्हा एकदा एकाच दिवशी १३ हजारांहून अधिक रुग्णांनी करोनावर मात करण्यास यश मिळवले आहे. आज दिवसभरात राज्यातील विविध रुग्णालयांतून १३ हजार ३४८ रुग्ण करोनाविरुद्धची लढाई जिंकून घरी परतले आहेत. तर, राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्णांनी करोनाला हरवलं असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६८.२५ % इतका झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


करोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. आज नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अधिक आहे. त्यामुळं आरोग्य प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं चित्र आहे. आज राज्यात १२ हजार २४८ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४ लाख १५ हजार ३३२ पर्यंत पोहोचली आहे. राज्यात १०,००, ५८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ९५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज नोंद झालेले मृत्यू

मुंबई मनपा-१०६६ (४८), ठाणे- २४७ (७), ठाणे मनपा-२१४ (३),नवी मुंबई मनपा-३४८ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३१९ (१३),उल्हासनगर मनपा-२४ (१), भिवंडी निजामपूर मनपा-२४ (२), मीरा भाईंदर मनपा-११७ (१२), पालघर-२२७ (५), वसई-विरार मनपा-२२७ (५), रायगड-२३९ (५), पनवेल मनपा-२०६ (२), नाशिक-१३६ (३), नाशिक मनपा-८०७ (९), मालेगाव मनपा-२९ (२),अहमदनगर-३९९ (१),अहमदनगर मनपा-१९९ (३), धुळे-९५, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२७३ (२४), जळगाव मनपा-५७ (४), नंदूरबार-२६, पुणे- ५१७ (१७), पुणे मनपा-१४३३ (५८), पिंपरी चिंचवड मनपा-१०६६ (२०), सोलापूर-३२७ (७), सोलापूर मनपा-८० (३), सातारा-२५७ (८), कोल्हापूर-३०७ (८), कोल्हापूर मनपा-१३७ (५), सांगली-६९ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-२४० (६), सिंधुदूर्ग-२७ (२), रत्नागिरी-१०३ (२), औरंगाबाद-१६५ (७), औरंगाबाद मनपा-११५ (२), जालना-११० (१), हिंगोली-३१ (२), परभणी-२१ (४), परभणी मनपा-५३ (३), लातूर-१७८ (८), लातूर मनपा-१०१ (४), उस्मानाबाद-१६१ (१), बीड-२३५ (१), नांदेड-१४१ (३), नांदेड मनपा-१ (२), अकोला-४२, अकोला मनपा-२६, अमरावती-१४, अमरावती मनपा-५४, यवतमाळ-८८ (१०), बुलढाणा-८६ (३), वाशिम-४२, नागपूर-११६ (३), नागपूर मनपा-४८८ (३७), वर्धा-२३ (१), भंडारा-२, गोंदिया-२८ (१), चंद्रपूर-१८, चंद्रपूर मनपा-१३, गडचिरोली-५ (१), इतर राज्य २३.

आपलं सरकार