Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SushantSingRajputDeathCase : सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाचा सीबीआय चौकशीला जोरदार आक्षेप , बिहार सरकारच्या भूमिकेचाही घेतला समाचार

Spread the love

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू  प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारने  मुंबई पोलिसांकडे दिलेला असतानाच बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला राज्य सरकारनं विरोध केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारने  या प्रकरणाच्या तपासाचा तपशील बंद लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयातसमोर सादर केला. त्याचबरोबर राज्य सरकारने  या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला विरोध केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरात महाराष्ट्र सरकारने   बिहार सरकारवर आरोप केले आहेत. “सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार सरकारनं नियमांच्या विरोधात जाऊन काम केलं आहे. बिहार सरकारकडे केवळ झिरो एफआयआर दाखल करून घेण्याचा अधिकार होता. गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे पाठवायला हवा होता. मात्र, चौकशीचा कोणताही अधिकार नसताना बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला,” असं राज्य सरकारनं म्हटलं आहे. “या प्रकरणाचा बिहार पोलिसांनी तपास करणं हेच बेकायदेशीर असताना बिहार सरकार सीबीआय चौकशीची शिफारस कशी करू शकते. केंद्र सरकारनेही सीबीआय चौकशीची शिफारस स्वीकारून चूक केली आहे. या प्रकरणात बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस करणं योग्य नाही. केंद्र सरकारकडून ही शिफारस स्वीकारली जाणे केंद्र-राज्यांच्या संवैधानिक मर्यादांच्या विरोधात आहे,  असे  राज्य सरकारने  म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!