Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SushantSingRajputDeathCase : सीबीआय चौकशीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली हि प्रतिक्रिया….

Spread the love

‘सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात मुंबई पोलीस अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं काम करत आहेत,’ असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. सरकारची यापुढची भूमिका काय असेल या विषयी बोलताना आ. अनिल देशमुख म्हणाले कि ,  मुंबई पोलीस योग्य पद्धतीनं काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केली. सुशांतसिंह प्रकरणात ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालय याबाबत काय निर्णय देते त्या आधारावर आम्ही पुढील दिशा ठरवणार आहोत,’ असं देशमुख यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असून ते तपासात हलगर्जीपणा करत आहेत,’ असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचंही भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळं या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनं सीबीआयकडे द्यावा, अशी भाजपची मागणी आहे. केंद्र सरकारनं स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली असली तरी राज्य सरकारनं अद्याप हा तपास सीबीआयकडे सोपवलेला नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!