Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय

Spread the love

सन २०१९-२० व २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी कोरोनामुळे परदेशातून किंवा भारतातून ऑनलाईन शिक्षण घेत असतील तर त्यांनाही फेब्रुवारी २०२० ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

समाज कल्याण आयुक्त पुणे यांना याबाबत राज्य शासन स्तरावरून आदेश पारित करण्यात आला असून, शैक्षणिक फी व निर्वाह भत्ता देण्याच्या या निर्णयास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

या निर्णयानुसार २०१९ – २० व त्याआधीच्या वर्षामध्ये परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड होऊन परदेशातील विद्यापीठात शिक्षण घेत असलेले व सध्या शिक्षण सुरू असलेले विद्यार्थी सद्यस्थितीत परदेशात राहून ऑनलाईन शिक्षण घेत असतील त्यांना फेब्रुवारी २०२० ते सप्टेंबर २०२० या सत्रासाठी अनुज्ञेय असलेली शैक्षणिक फी व निर्वाहभत्ता मंजूर करण्यात आला आहे.तसेच २०१९ – २० मध्ये निवड झालेले परंतु सद्यस्थितीत भारतात राहून किंवा भारतात परत येऊन पहिल्या सत्रासाठी ऑनलाईन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना २०२० – २१च्या पहिल्या सहामाहिसाठी अनुज्ञेय असलेली शैक्षणिक फी मंजूर करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत जे विद्यार्थी भारतात परत येण्यास इच्छुक असतील त्यांना ते ज्या दिनांकास परत येतील तोपर्यंतचा निर्वाहभत्ता व येण्या-जाण्याचे नियमानुसार विमान प्रवास भाडे देखील देण्यात येणार असल्याचे या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात परदेश शिष्यवृत्तीचे लाभार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळून त्यांना पाठबळ देण्याचा आमचा प्रयत्न असून, सप्टेंबर २०२० नंतर संबंधित विद्यापीठाशी चर्चा करून पुढील शैक्षणिक फी संबंधी निर्णय घेण्यात येईल असे श्री.धनंजय मुंडे यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!