Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCrimeNewsUpdate : अजब नवरीची गजब कथा , ८ महिन्यात तिने केले ६ लग्न… अखेर आंतरराज्य “लुटारू नवरी ” अखेर पोलिसांच्या जाळ्यात !!

Spread the love

मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये  एक दोन नव्हे तर ८ महिन्यात ६ लग्न करून नवऱ्यांची वाट लावणाऱ्या नवरीला पोलिसांनी अटक केली आहे . स्वतः नवरीचा बनाव करणाऱ्या मीनाक्षी नामक महिलेने  स्वतःच हि धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. तिच्या जबाबानुसार तिला एका लग्नासाठी तिला या सर्व प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीकडून दहा हजार रुपये मिळायचे. मीनाक्षीने आतापर्यंत राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील अनेक ठिकाणी खोटी लग्न केल्याची कबुली दिली असून तिला पोलिसांनी अटक केली असून तिच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.


विशेष म्हणजे रतलाममध्ये राहणाऱ्या एका नवरदेवाने अशा मुलीशी लग्न केले जीची ओळख आज एक ‘लुटेरी दुल्हन’ म्हणून झाली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दिलेली अधिक माहिती अशी कि , तिने अखेरच्या लग्नानंतर दोन दिवसांनी घरी जाण्याचा आग्रह धरला तेंव्हा नवरदेवही तिच्याबरोबर निघाला. पण सासरी जाताना काहीतरी गडबड असल्याचे  नवरदेवाच्या लक्षात आले परंतु  तोपर्यंत वेळ निघून गेली होती. नवरदेवाच्या हत्येचा  प्लान आधीच करण्यात आला होता त्यानुसार दुसर्‍या दिवशी लोकांना नवरदेवाचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळला.  या प्रकरणात अधिक तपास केल्यांनतर पोलिसांनी तिच्यासोबतच्या दरोडेखोरांच्या टोळीचा छडा लावण्यात यश मिळवले . पोलिसांच्या तपासानुसार यापूर्वी आरोपी नवरीने राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या अनेक भागात खोटा विवाह करून कुटुंबियांना लुटल्याने ती आंतरराज्य खोटी नवरी असल्याचे उघड झाले असून यामुळे पोलिसही  आश्चर्यचकित झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार सैलाना इथं महेंद्र मोतीलाल कलाल (29) याचा मृतदेह ७  दिवसांपूर्वी सापडला होता. सुरुवातीच्या तपासात असं आढळून आलं की, या युवकाची हत्याही  त्याची पत्नी मीनाक्षीने केली होती. महेंद्रचं दोन दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. पण त्याच्या हत्येनंतर आरोपी पत्नी मीनाक्षी तिच्या टोळीसह फरार असल्याची माहिती पोलिसांच्या कानावर पडली आणि तपासाला सुरुवात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मॅरेज ब्युरोमार्फत महेंद्र आणि मीनाक्षीचा विवाह झाला होता. लग्नासाठी मीनाक्षीच्या खोट्या भावाने अडीच लाख रुपये घेतले होते, त्यानंतर न्यायालय आणि कुटूंबाच्या संमतीने दोघांनी लग्न केले. लग्नाच्या दोनच दिवसानंतर, मीनाक्षीचे नातेवाईक म्हणून आलेल्या चार जणांनी महेंद्रला त्यांच्या गाडीत बसवलं आणि हत्येचा कट आखला. दुसऱ्या दिवशी महेंद्रचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांना संशयाची सुई दिसली आणि तसा तपास सुरू झाला. पोलिसांनी तपास करत आरोपी तरुणीचा शोध घेतला आणि तिच्या टोळीसकट तिला ताब्यात घेतलं. पोलिसांनी मिनाक्षीला फोन नंबरवरून शोधलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!