Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaEffectWorldNews : हॅण्ड सॅनिटायझर पोटात गेल्यामुळे चौघांचा मृत्यू, तिघांना अंधत्व…

Spread the love

कोरोना संसर्गाच्या जगभरातील अनेक बातम्या रोज कानावर पडत आहेत. दोन -तीन दिवसांपूर्वी चीनच्या वुहानमधून कोरोनाच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या संदर्भातील बातमीने जगभरात काळजी केली जात असतानाच आता अमेरिकेच्या वॊशिंग्टन मधून धक्कादायक बातमी आली आहे. या वृत्तानुसार कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ करण्याचे आवाहन केल्यानंतर त्याचे सर्वत्र पालन होत असतानाच ,  हॅण्ड सॅनिटायझर पोटात गेल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. हॅण्ड सॅनिटायझर प्राशन केल्यामुळे १५ जणांना त्रास झाला. त्यातील चौघे मृ्त्यूमुखी पडले असून तिघांना अंधत्व आले आहे. हॅण्ड सॅनिटायझरमधील मिथेनॉल घटकामुळे ही जीवितहानी झाली असल्याचे म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अल्कोहोल युक्त हॅण्ड सॅनिटायझरच्या वापरामुळे करोनाच्या विषाणूला दूर ठेवता येत असल्याचे म्हटले जाते. मान्यताप्राप्त हॅण्ड सॅनिटायझरमध्ये विषाणूंचा खात्मा करण्यासाठी मुख्यत: इथाइल अल्कोहोल असतो. हे अल्कोहोल पोटात गेल्यास शरिराचे मोठे नुकसान होत नसल्याचे म्हटले जाते. मात्र, काही कंपन्यांकडून इथाइल अल्कोहोलऐवजी विषारी मेथेनॉलचा वापर करत आहेत. त्यामुळे मानवाच्या शरीराला अपाय होत असल्याचेही समोर आले आहे.

अमेरिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिथेनॉल किंवा इथेनॉल पोटात गेल्यास डोकेदुखी, दृष्टी अंधुक होणे, मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे आदी त्रास जाणवू शकतात. मिथेनॉल विषबाधामुळे पचनक्रिया बिघडणे, पोटात विष निर्माण होणे, अंधत्व आणि मृत्यू देखील होण्याची दाट शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान अमेरिकेतील अन्न आणि औषध प्रशासनाने जूनमध्ये मेक्सिकोमध्ये उत्पादित करण्यात येत असलेल्या हॅण्ड सॅनिटायझर जेलबाबत इशारा दिला होता. या हॅण्ड सॅनिटायझरमध्ये मोठ्या प्रमाणावर मेथेनॉल असल्याचेही म्हटले होते. मागील काही दिवसांपासून एफडीएकडून अशा उत्पादनांची यादी काढण्यात येत होती. एफडीएने मिथेनॉल असलेल्या अनेक हॅण्ड सॅनिटायझर उत्पादनांची ओळख पटवलेली आहे. एफडीएच्या सूचनेनंतर आता विक्रेत्यांनी आणि वितरकांनी हॅण्ड सॅनिटायझर बाजारातून मागे घेतले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!