AurangabadNewsUpdate : कच्ची घाटीच्या खड्ड्यात बुडून पुन्हा एका युवकाचा मृत्यू

Spread the love

वरुडकाजीनजीक असलेल्या कच्ची घाटी भागातील छोट्या नदी पात्रात बुडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शेख शोएब शेख रऊफ (२५, रा. अराफत मशिदीजवळ, किराडपुरा) असे मृताचे नाव आहे. यापुर्वी ३१ जुलै रोजी देखील याच भागात पाच जणांचा बुडून अंत झाला होता. शुक्रवारी दुपारी शेख शोएब हा दोन मित्रांसोबत दुपारी चारच्या सुमारास वरुडकाजीनजीक असलेल्या कच्ची घाटी शिवारातील पिवळ्या मातीचा कट्टा येथे पोहोण्यासाठी गेला होता. शेख शोएब याला पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याने तुडूंब भरलेल्या एका पंधरा फुटाच्या खड्ड्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे, पोलिस नाईक रवींद्र साळवे व अजित शेकडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याला पोलिसांनी बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले. त्याला घाटीत नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद चिकलठाणा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस नाईक रवींद्र साळवे करत आहेत.

आपलं सरकार