AurangabadNewsUpdate : दारुड्या पतीला कंटाळून वर्षभराच्या चिमुकलीसमोर आईची आत्महत्या

Spread the love

औरंंंगाबाद : पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून १४ महिन्याच्या मुलीच्या आईने विष प्राशन करून आत्महत्या  केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद तालुक्यातील वाहेगाव येथे घडली.या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुर्गा लक्ष्मण शिंदे (वय २२,रा.वाहेगाव, ता.औरंगाबाद) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गा हिचे लक्ष्मन शिंदे यांच्या सोबत लग्न झाले होते.त्यांना एक १४ महिन्याची मुलगी आहे. लक्ष्मण ला दारूचे व्यसन आहे.अनेकवेळा सांगून देखील तो दारूचे व्यसन काही कमी करीत नसे रोज मित्रांना घेऊन तो पार्टीचा बेत आखत असे तर रात्री बे रात्री तो घरी येत असे.या सर्व प्रकाराला दुर्गा प्रचंड वैतागली होती.दुर्गा ही अत्यन्त शांत स्वभावाची होती,  अनेक वेळा पती-पत्नी मध्ये किरकोळ वाद होत असे. लक्ष्मण चा डीजे साउंड सिस्टीम चा व्यवसाय आहे त्या कडे दोन डीजे सिस्टीम आहे  मात्र मागील चार महिन्यापासून लॉक डाऊन असल्याने तो आर्थिक अडचणीत आला होता,त्यामुळे माहेरच्या मंडळींनी त्यास आर्थिक मदत, सोने देखील दिले होते. आर्थिक चणचण जाणवल्यास घराचा गाडा चालविण्यासाठी  बँकेचा एक कोरा चेक देखील दिला होता.

सासरच्या मंडळी कडून आर्थिक मदत मिळाल्या नंतर त्याने दुसरा व्यवसाय सुरू करावा अशी सर्वांची इच्छा होती मात्र तसे न करता तो अधिकच दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता.रोजच्या दारू पार्ट्यांमुळे दुर्गा वैतागली होती.शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता पती-पत्नी मध्ये बोलणे झाले.व तुम्ही घरी या मी आत्महत्या करते असे दुर्गाने सांगितले त्यावरून लक्ष्मण धावत घरी आला.मात्र तो पर्यंत दुर्गाने घराच्या दुसऱ्या  मजल्यावर विष प्राशन केले होते.तिला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात उपचार कामी हलविण्यात आले.मात्र तिथे वैधकीय अअधिकाऱ्यांनी  तपासून दुर्गाला मृत घोषित केले.अशी माहिती नातेवाईकांनी करमाड पोलिसा समोर  घाटी रुग्णालयात पत्रकारांना दिली. या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार जी. एस.भताने हे करीत आहेत.

आपलं सरकार