AurangabadCrimeUpdate : “लिव्हईन” मधे राहात असलेल्या महिलेची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा

Spread the love

औरंगाबाद – मुकुंदवाडीतील राजनगरात लिव्हइन मधे राहात असलेल्या महिलेने प्रियकराशी झालेल्या भांडणातून गळफास घेतला आणि  उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला . घटना घडल्यानंतर  तिचा प्रियकर फरार असून त्याच्यावर CR 343 /020  नुसार कलम 306, 323,504 भा. द. वि प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली थोडक्यात हक्कीकत अशी की, मयत कविता अमोल साठे , वय 24 हिचे  सन 2000 मध्ये रामकिसन नाडे सोबत लग्न होऊन त्याचा पासून 2 अपत्य आहेत . त्यानंतर 2008 साली शफिक शेख याच्या सोबत तिचे लग्न झाले असून त्यांच्या पासून 2 अपत्य आहे असे एकूण तिला 4 अपत्य आहेत तर  2015 पासून तिचे अमोल साठे याचा सोबत प्रेमसंबंध झाल्याने मयत महिला अमोल साठे हे मागील 5 वर्ष पासून पती पत्नी सारखे राहत होते. दि. 4/8/2020 रोजी अमोल साठे हा रात्री 12.00 वा. सु. घरी आला असता मयत महिला शेजारच्या घरी झोपलेली असल्याने तु का शेजारच्या घरी झोपली म्हणून मारहाण केली असता तिने रागाच्या भरात त्यांचा घरात जाऊन आतमध्ये कडी लावून फाशी घेतली असा जबाब दिल्याने सदर गुन्हा दाखल केला आहे, आरोपी अमोल मयत महिलेस घाटी दवाखाना येथे दाखल करून पळून गेल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.  या प्रकरणी पीढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अमोल म्हस्के करंत आहेत

आपलं सरकार