Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaEffect : धक्कादायक : कोरोनाबाधित वृद्ध महिलेला तिच्याच कुटुंबीयांनी जंगलात सोडून दिले ….

Spread the love

कोरोनाच्या भीतीने अनेक लोकांनी आपल्या आप्तेष्टाना दूर लोटल्याच्या बातम्या ताज्या असतानाच औरंगाबादमध्येही माणुसकीला काळीमा फासणारी अशीच एक घटना घडली आहे. या वृत्तानुसार कोरोनाच्या भीतीने रक्ताच्या नात्यातील माणसांनीच ९० वर्षाय वृद्धेला  जंगलात सोडण्याचा प्रकार घडला आहे. वास्तविक  या वृद्धेला करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर सरकारी रुग्णालयाला कळवणे आणि रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित होते. पण नातवाईक आणि कुटुंबियांनी तिला जंगलात नेऊन सोडले. वय झाल्यामुळे या आजीला हालचाल करणेही कठीण होते. अशा परिस्थिती काळजी करणं गरजेचं होतं. पण, रक्ताच्या नातेवाईकांनीच या वृद्ध महिलेला जंगलात नेऊन टाकले. आजीसोबत केलेल्या वर्तनामुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या घटनेची  माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या  वृद्ध महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी संबंधित वृद्ध महिलेच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबधित आजीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुटुंबियांना आजीला सांभाळण्यास तयार नसल्यास आमचे सहकारी पोलिसांनी त्यांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली आहे, असे चिकलठाणा  पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक महेश आंधळे यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!