Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsCurrentUpdate : मोठी बातमी : केरळ येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात, १४ जण ठार तर १२३ जखमी, महाराष्ट्रातील वैमानिक दीपक साठे ठार

Spread the love

लँडिंग करताना एअर इंडियाचे  विमान केरळच्या धावपट्टीवरून घसरून झालेल्या अपघातात १४ जण ठार तर १२३ जखमी झाले असल्याचे वृत्त आहे . यापैकी १५ जणांचीप्रकृती गंभीर आहे, मलप्पूरमच्या पोलीस अधीक्षकांनी हि माहिती दिली असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. या विमानात १९१ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. दुबईहून हे विमान कालिकत येथे आले होते. विमानातील प्रवाशांना वाचण्यासाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. केरळमधील कोझीकोड येथील करिपूर  विमानतळावर हे विमान लँडिंग करत होतं. लँडिंगवेळी विमान धापट्टीवरून घसरलं. धापवपट्टीवरून घसरत हे विमान दरीत कोसळलं. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले असून यात विमानाच्या पायलट आणि को-पायलटचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या विमान अपघातात मृत्यू झालेल्या वैमानिकांपैकी मुंबईचे वैमानिक दीपक वसंत साठे यांचा समावेश आहे. निधनाची माहिती मिळताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे

या विषयी अधिक माहिती अशी कि , एअर इंडियाच्या दुबई-कोझीकोड (IX-1344)) या विमानाला मोठा अपघात झाला आहे. या विमानात ६ क्रू मेबर्स आणि २ दोन पायलटसह १९१ प्रवासी होते. ही दुर्घटना पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली. करिपूर विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरल्याने विमानाला मोठा अपघात झाला. विमानत उतरत असताना ते धावपट्टीवरून घसरले आणि दरीत कोसळले. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले आहेत, अशी माहिती डीजीसीएने दिली आहे. या प्रकरणी डीजीसीएने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तर मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिलीय. मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना फोन

दरम्यान विमान दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना फोन केला. केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तर कोझीकोड प्रशासातील वरिष्ठ अधिकारी, मलप्पूरमचे जिल्हाधिकारी आणि आयजी अशोक यादव हे घटनास्थळी आहेत. मदत आणि बचावकार्यात सुरू आहे, अशी माहिती केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना दिली. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही मदत आणि बचावकार्यत आवश्यक ती व्यवस्था करण्याचे आदेश पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाला आदेश दिले आहे.तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही अपघातग्रस्तांना मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

या अपघातात मृत्यू किंवा जखमी झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी माहिती देण्यासाठी 0495 – 2376901 या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करावा, असे  आवाहन कोझीकोडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. विमानात १७४ प्रवासी, १० बालकं, २ पायलट आणि ५ केबिन क्रूचा समावेश होता. विमान दुर्घटनेनंतर बचायकार्य वेगास सुरू आहे. विमानातील जखमी प्रवाशांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती नागरि हवाई वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान युएईमधील भारतीय राजदुतांनी या घटनेनंतर हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. नागरिकांनी माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे  आवाहन त्यांनी केले  आहे. helplines – 056 546 3903, 0543090572, 0543090572, 0543090575 एअर इंडिया एक्स्प्रेसकडून दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे. तसंच यामुळे विमान वाहतुकीत काहीसा अडथळा निर्माण झाला आहे. पण वंद भारत ही मोहीम सुरूच राहिल, असं एअर इंडिया एक्स्प्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचे वैमानिक दीपक वसंत साठे अपघातात ठार

केरळच्या कोझिकोड विमानातळाच्या धावपट्टीपरून घसरून झालेल्या विमान अपघातात दोन वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघातात मृत्यू झालेल्या वैमानिकांपैकी मुंबईचे वैमानिक दीपक वसंत साठे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. निधनाची माहिती मिळताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे. हवाईदल अधिकारी राहिलेले दीपक साठे हे कुशल लढाऊ वैमानिक होते. तसेच सुमारे १५ वर्षांपासून ते एअर इंडियामध्ये वैमानिक होते. दीपक वसंत साठे हे १९८१ साली हवाईदलात वैमानिक म्हणून रुजू झाले. त्याआधी त्यांनी पुण्याच्या एनडीएतून प्रशिक्षण घेतले होते. २००३ पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा दिली. २००३ मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते एअर इंडियामध्ये रुजू झाले. सुरुवातीला अनेक वर्षे त्यांनी एअर इंडियाच्या ताफ्यातील मोठ्या आकाराचे ‘एअरबस ३१०’ हे विमान उडवले. त्यानंतर अलिकडेच ते बोइंग विमानावर स्थलांतरित झाले होते. केरळमधील अपघात हा बोइंग ७३७ विमानाचाच होता. दीपक साठे हे हवाईदल अकादमीतील प्रशिक्षणात अग्रेसर राहिले होते. मानाची तलवार त्यावेळी त्यांनी जिंकली होती. २२ वर्षांच्या हवाईदलातील सेवेत ते हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) चाचणी वैमानिक अर्थात टेस्ट पायलटदेखील राहिले होते, हे विशेष. हे काम अत्यंत जिकीरीचे असते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना व मोठा आप्त परिवार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!