Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : धक्कादायक : देशात दररोज ५० हजार नव्या रुग्णांची नोंद…

Spread the love

देशातील आज सलग आठव्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात तब्बल 26 हजार 282 नवीन रुग्ण सापडले तर, 904 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19 लाख 64 हजार 537 झाली आहे. तर मृतांचा आकडा हा 40 हजार 699 झाला आहे.

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, संध्या देशात 5 लाख 95 हजार 501 सक्रीय रुग्ण आहेत. तर 13 लाख 28 हजार 337 रुग्ण निरोगी झाले आहेत. हा दिलासादायक बाब असली तरी, कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंतेचा विषय आहेत. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिको हे सर्वात जास्त प्रभावी देश आहेत. या देशांमध्ये मृतांची संख्या सर्वात जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत 49 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 1 लाख 60 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बुधवारी महाराष्ट्रात पुन्हा एकदा 10 हजारांहून अधिक संख्येने नवे रुग्ण सापडले. याशिवाय 334 जणांचा मृत्यूही नोंदला गेला आहे.1 ऑगस्टपासून राज्यात पुनःश्च हरिओमची घोषणा केली असतानाच आज महाराष्ट्रातून धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 10,309 कोरोनारुग्णांचं निदान झालं. गेले काही दिवस दहा हजारांच्या आसपास नव्या कोरोनारुग्ण सापडत आहेत. त्यात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यातून आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!