Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaDelhiUpdate : याला म्हणतात सरकार !! कोरोना योद्धा डॉक्टरच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी असे पार पाडले आपले कर्तव्य … !!

Spread the love

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल रुग्णालय आणि कॉलेजमध्ये एड-हॉकवर ज्युनिअर रेजिडेंट असलेले कोरोना योद्धा डॉ. जोगिंदर चौधरी यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटींचा मदत निधी दिला आहे. काल  सायंकाळी 4 वाजता डॉक्टर जोंगिदर चौधरी यांच्या कुटुंबीयांनी सिव्हील लाइंसस्थित मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.  मुख्यमंत्री केजरीवाल यांनी डॉ. जोगिंदर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आणि कुटुंबीयांना सांत्वन केलं.

डॉ. चौधरी बाबासाहेब आंबेडकर मेडिकल रुग्णालयात डॉक्टर होते. त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांवर उपचार केले. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर एक महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यातच त्यांचं निधन झालं. यानंतर केजरीवाल म्हणाले, कोणाच्या जीवाचं मूल्य नसतं मात्र या छोट्याशा निधीतून त्यांच्या कुटुंबीयांना मदत होईल.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करीत सांगितले की, दिल्ली सरकारच्या रुग्णालयात तैनात आमचे कोरोना वॉरिअर डॉ. जोगिंदर चौधरी यांनी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा केली. काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाल्याचे चौधरी यांचं निधन झालं होतं. आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत केजरीवाल यांनी मदत निधी दिला. भविष्यातही चौधरी यांच्या कुटुंबीयांना शक्य ती मदत करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!