Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraCurrentUpdate : चिंताजनक : राज्यात आज सर्वाधिक १० हजाराहून अधिक रुग्ण सापडले, ३३४ जणांचा मृत्यू

Spread the love

राज्यात आज  पुन्हा एकदा 10 हजारांहून अधिक संख्येने नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. याशिवाय 334 जणांचा मृत्यूही नोंदला गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्यातच पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडत असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. दरम्यान 1 ऑगस्टपासून राज्यात पुनःश्च हरिओम अर्थात Mission Begin Again ची घोषणा केली असतानाच आज महाराष्ट्रातून धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 10,309 कोरोनारुग्णांचं निदान झालं आहे. गेले काही दिवस दहा हजारांच्या आसपास नव्या कोरोनारुग्ण सापडत आहेत. त्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले आहेत.

आज नोंदल्या गेलेल्या 334 मृत्यूंपैकी गेल्या 48 तासांमध्ये झालेले 242 आहेत. तर 60 गेल्या आठवड्याभरातले आहेत. उरलेले 32 त्यापूर्वी झालेले मृत्यू आहेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,68,265 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 16,476 वर गेला आहे. दिवसभरात 334 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यभरात उपचार सुरू असलेले (Active corona patients) तब्बल 1,45,961 रुग्ण आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार एकीकडे कोविड रुग्ण बरे होण्याचे  प्रमाण वाढत असले , तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झाले आहे. देशाच्या Recovery Rate पेक्षा महाराष्ट्राचा कोरोनाचा दर अद्याप जास्त आहे. देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदरही अधिक आहे. राज्यातला मृत्यूदर 3.52 एवढा झाला आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 3 टक्क्यांच्या खाली आहे. दरम्यान अनलॉकच्या घोषणेनंतर कोरोना  रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मुंबईपेक्षा पुण्यात रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. आता सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.

पुणे, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही शहारांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला. पण तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढतेच आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात साडेचार लाखांवर कोरोना रुग्ण सापडले असले तरी त्यातले 3,05,521 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

आज राज्य शासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार अॅक्टिव्ह रुग्ण – 1,45,961, 24 तासांतली वाढ – 10,309, बरे झालेले रुग्ण -3,05,521, एकूण मृत्यू -16,476, एकूण रुग्ण – 4,68,265, सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुणे जिल्ह्यात आहे.एकूण रुग्णसंख्या मुंबईत अधिक असली तरी नवे रुग्ण कमी झाले आहेत आणि बऱ्या झालेल्या रुग्णांचं प्रमाणही मुंबईत मोठं आहे.

अॅक्टिव्ह रुग्णसंख्या जिल्ह्यानुसार : पुणे 39385 । ठाणे 30406 । मुंबई 20679 । पालघर 6233 । नाशिक 5843 । रायगड 4689 । औरंगाबाद 4674

आपलं सरकार

Click to listen highlighted text!