Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RajsthanCrimeNewsUpdate : शिक्षकी पेशाला काळिमा , संचालकांसह १० शिक्षकांविरुद्ध अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा

Spread the love

सहावी इयत्तेत शिकणाऱ्या एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतीलच १० शिक्षकांनी केलेल्या  सामूहिक बलात्काराच्या घटनेने राजस्थानमधील अलवर हादरले आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या नराधम शिक्षकांनी याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर, कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकीही आरोपींनी दिली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अलवर जिल्ह्यातील नारायणपूर परिसरात एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच शाळेतील दहा शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने पोलीस ठाण्यात शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली असून  पोलिसांनी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत बलात्कार करणाऱ्या १० शिक्षकांसह त्यांना मदत करणाऱ्या तीन शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल करून सहपोलीस अधीक्षक शैलेंद्र इंदोलिया यांच्याकडे तपास सोपवला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी पीडितेची भेट घेतली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.

या प्रकरणी पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात नेऊन वैद्यकीय चाचणी केली आहे. तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. याविषयी अधिक माहिती देताना ,नारायणपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख सुरेश सिंह यांनी सांगितले, की नारायणपूर परिसरातील एका शाळेत इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेतीलच दहा शिक्षकांनी बलात्कार केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शाळेतील तीन शिक्षिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या शिक्षिकांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे पालक शाळेचा दाखला घेऊन शाळेत गेले होते. मात्र, शिक्षक मुलीच्या घरी गेले आणि तिला शाळेत येऊन दाखला घेऊन जाण्यास सांगितले. घरी अचानक आलेल्या शिक्षकांना पाहून मुलगी जोरजोरात रडू लागली.

याबाबत पालकांनी मुलीला याबाबत विचारलं, त्यावेळी तिनं आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली. कुटुंबीय मुलीला घेऊन नारायणपूर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी शाळेच्या संचालकांसह आठ ते दहा शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली. माझी मुलगी इयत्ता तिसरीपासून या शाळेत शिकत आहे. २० जुलै रोजी शाळेतील शिक्षक सतीश शर्मा याने मुलीला धमकावले आणि शाळेचा दाखला घेऊन जाण्यास सांगितले, तसेच भेट घेण्यास सांगितले. २३ जुलै रोजी शाळेचे व्यवस्थापक आणि सतीश शर्मा हे घरी आले. दाखला घेण्यासाठी मुलीला शाळेत पाठवा असे त्यांनी सांगितले. त्यांना पाहून मुलगी रडू लागली. मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला. तिला विचारलं असता, तिनं घडलेला सगळा प्रकार सांगितला, असे पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले तेंव्हा हा पकार उघडकीस आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!