पुणे एल्गार परिषद प्रकरणी अटक केलेल्या कवी हनीबाबूच्या घरी “एनआय”चा छापा , कागद, पुस्तक , कॉम्प्युटरची हार्ड-डिस्क, पेन ड्राईव्ह जप्त… !!

Spread the love

पुण्यातील बहुचर्चित  एल्गार परिषदेचं आयोजन करून भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराला खतपाणी घालणारी भाषणं केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात एका प्रोफेसरला अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणंने  म्हणजेच NIA ही कारवाई केली होती. हनी बाबू मुसलियारविट्टील असं या प्राध्यापकाचं नाव असून तो दिल्ली विद्यापीठात इंग्रजीचा प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. दरम्यान NIA च्या अधिकाऱ्यांनी आता आरोपी हनी बाबू याच्या नोएडा येथील घरावर छापा टाकला आहे. हनि बाबू याच्या घरातून कॉम्प्युटरची हार्ड-डिस्क, पेन ड्राईव्ह आणि काही साहित्य अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले  आहे. आरोपी हनी बाबू याच्यावर नक्षलवादाचा प्रचार करणे. तसेच त्यांना फंडिंग केल्याचा आरोप आहे. NIA चे अधिकारी सध्या हनी बाबू याची कसून चौकशी करत आहे.

हनी बाबू मुसलियारविट्टील यांच्यावर नक्षली कारवायांना हातभार लावल्याचा आरोप आहे. भीमा कोरेगांव प्रकरणी कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) त्यांची चौकशी करून नंतर अटक केली आहे. देशात बंदी घातलेल्या CPI (माओवादी) या संघटनेचे ते पदाधिकारी असल्याची माहिती समजते. पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषद भरवण्यात आली होती. दलित अस्मितेचं प्रतिक असणाऱ्या भीमा कोरेगांव इथल्या लढ्याच्या स्मरणार्थ ही परिषद आयोजित करण्यात आली होती. याच्या दुसऱ्याच दिवशी भीमा कोरेगाव इथे जातीय गटांत दंगल उसळली. हि एल्गार परिषदेमागे माओवाद्यांची संघटना असल्याचा संशय व्यक्त केला गेला आणि त्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या एल्गार परिषद प्रकरणी तेलुगू साहित्यिक वरवरा रावसुद्धा अटकेत आहेत. आता हनी बाबू यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात NIA च्या अधिकाऱ्यांना काय महत्त्वाची माहिती मिळते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आपलं सरकार