CoronaCurrentUpdate : ताजी बातमी : गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

Advertisements
Advertisements
Spread the love

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. करोनाचे सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर मी चाचणी केली. त्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे शहा यानी म्हटले आहे. माझी तब्येत ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शहा यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक दिवसापूर्वीच लोकमान्य बाळ गंगाधार टिळक यांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. त्या कार्यक्रमात मंचावर त्यांच्यासोबत इतरही काही लोक उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला आयसोलेट करून घेऊन स्वत:ची करोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. शहा यांना प्राथमिक प्राथमिक लक्षणे असल्याने त्यांना होम क्वारंटीन का केले नाही, या बाबत डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना होम क्वारंटीन न करता थेट रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आपली तब्येत ठीक असल्याचे शहा यांनी आवर्जून सांगितले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, तसेच केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अमित शहा हे लवकरात लवकर बरे होतील, अशी आशा व्यक्त केली आहे. प्रत्येक आव्हानांपुढे अमित शहा यांची दृढता आणि इच्छाशक्ती हे एक नेहमीच उदाहरण आहे. कोरोनाच्या या मोठ्या आव्हानावर देखील आपण विजय प्राप्त कराला असा विश्वास सिंह आणि प्रसाद यांनी व्यक्त केला आहे. देशात करोना विषाणूचा उद्रेक झाल्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सतत देशभरातील करोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राजधानी दिल्लीतील परिस्थितीचेही त्यांनी स्वत: लक्ष घालून परिस्थिती हाताळली होती. त्यांनी आतापर्यंत गृह आणि आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या बैठक आयोजित कर नियमितपणे कोविड-१९च्या ताज्या स्थितीचा आढावा घेत आले आहेत. लॉकडाउननंतर देशात अनलॉकची प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यामध्येही अमित शहा यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.

 

Leave a Reply

आपलं सरकार