Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VidarbhaNewsUpdate : साखर कारखान्यात बायोगॅसच्या टाकीत स्फोट होऊन पाच कामगार ठार

Spread the love

नागपूर जवळच्या बेला येथील मानस अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात बायोगॅसच्या टाकीत स्फोट होऊन पाच कामगार ठार झाले. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या स्फोटाने कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मंगेश प्रभाकर नौकरकर वय २१ , लीलाधर वामनराव शेंडे वय ४७, वासुदेव विठ्ठल लडी वय ३०, सचिन प्रकाश वाघमारे वय २४ व प्रफुल्ल पांडुरंग मुन वय २५ ,अ शी मृतकांची नावे आहेत. सर्व मृतक वडगाव येथील रहिवाशी असल्याने गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचही जण कारखान्यात काम करीतअचानक स्फोट झाला. कामगारांमध्ये खळबळ उडाली. गोंधळ निर्माण झाला. पाच जण जखमी झाले. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून पाचही जणांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक राकेश ओला ,उपअधीक्षक संजय पुरंदरे, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेला येथे धाव घेतली. स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिस करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!