MumbaiNewsCurrentUpdate : मुंबई महापौरांच्या मोठ्या भावाचाही कोरोनामुळे मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे  मोठे भाऊ  सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 7 दिवसांपासून सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सकळी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 10320 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 265 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या तब्बल दीड लाख सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण संख्या आहे. एकट्या मुंबईसह उपनगरात कोरोनाचे 1 लाख 14 हजार 284 रुग्ण आहेत. त्यापैकी 87 हजार 074 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 6353 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

Advertisements

महापौर किशोरी पेडणेकर यांनी  त्यांच्या आठवणीत एक कविताही पोस्ट केली आहे. गेल्या सात दिवसांपासून सुनील कदम यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर याही होम क्वारंटाइन झाल्या होत्या. मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर या १४ दिवस होम क्वारंटाइन झाल्या होत्या. त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजेच सुनील कदम यांनाही करोनाची लागण झाली होती. मागील सात दिवसांपासून नायर रुग्णालयात सुनील कदम यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर शनिवारी सकाळी सुनील कदम यांची प्राणज्योत मालवली.

Advertisements
Advertisements

दरम्यान  ठाणे महापालिका क्षेत्रात 355 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण 19075 झाली आहे. दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर या देखील होम क्वारंटाइन झाल्या होत्या. BMCच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. महापौर किशोरी पेडणेकर या 14 दिवस घरीच होत्या. महापौर किशोरी पेडणेकर काही पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या.

Leave a Reply

आपलं सरकार