IndiaCrimeNewsUpdate : ” या ” डॉक्टर ने केले तब्बल १०० हुन अधिक खून … !!

Advertisements
Advertisements
Spread the love

कोण ? कुठे ? कधी ? कुठल्या प्रकारचा गुन्हा करेल सांगता येत नाही . या धक्कादायक बातमीत तर चक्क डॉक्टर म्हटल्या जाणाऱ्या व्यक्तीने एक दोन नव्हे तर १०० हुन अधिक लोकांचे खून केले असल्याची माहिती उघड झाली असून स्वतः आरोपी डॉक्टरनेच त्याची कबुली दिली आहे .  डॉक्टरच्या व्यवसायात लोकांना निर्घृणपणे ठार करणाऱ्या या हैवान डॉक्टरचे नाव देवेंद्र शर्मा असे आहे.  सिरियल किलर देवेंद्र शर्मा याने यापूर्वी कबूल केलं होतं की त्याने 50 लोकांच्या हत्येनंतर त्याने खूनांची संख्या मोजणं सोडलं होतं. पण आता त्याने पोलिसांना धक्कादायक कबूली दिली आहे. आतापर्यंत देवेंद्र शर्मा याने 100 हून अधिक लोकांचा बळी घेतला असून, यातील अनेकांचा मृतदेह त्याने यूपीमध्ये एका कालव्यात मगरीला खाण्यासाठी टाकला आहे.

Advertisements

पोलिसांच्या माहितीनुसार डॉ. देवेंद्र शर्मा राजस्थानमध्ये डॉक्टर असताना तो अशा प्रकारे लोकांचा खून करायचा. गुंतवणूकीमध्ये एकदा फसवणूक झाल्यानंतर त्याने खूनाचा हा मार्ग निवडल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर त्याने अनेक डॉक्टरांसह किडनी प्रत्यारोपण रॅकेटही सुरू केलं. एवढेच नाही तर त्याने चोरी केलेली वाहनेही विकली. त्याची एक बनावट गॅस कंपनी असल्याचंही सांगण्यात येत आहे. देवेंद्र त्याच्या गाडीसाठी कॅब चालकांना ठार मारायचा. दिल्लीहून यूपीला जाण्यासाठी ज्यांनी टॅक्सी बुक केली त्यांना लुटायचा आणि ठार मारायचा. त्यानंतर त्याने उत्तर प्रदेशातील कासगंजच्या हजारा कालव्यात अनेक मृतदेह फेकले आहेत. या कालव्यात मोठ्या प्रमाणात मगरी असतात.आरोपी देवेंद्र शर्मा याला बुधवारी दिल्लीहून अटक करण्यात आली.

Advertisements
Advertisements

आरोपी देवेंद्र शर्मा याने 1984 मध्ये आयुर्वेदिक औषधात पदवी पूर्ण केली आणि राजस्थानमध्ये क्लिनिक सुरू केलं. त्यानंतर 1994 मध्ये त्याने गॅस एजन्सीसाठी एका कंपनीत 11 लाखांची गुंतवणूक केली. पण कंपनी अचानक गायब झाली. तोटा झाल्यानंतर त्याने 1995 मध्ये बनावट गॅस एजन्सी उघडली. एलपीजी सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकची लूट करणाऱ्या शर्मा याने एक टोळी तयार केली. यासाठी तो ड्रायव्हरला ठार मारायचा आणि ट्रक चोरायचा. त्याने टोळीसह तब्बल 24 खून केले असल्याची कबूली दिली आहे. त्यानंतर देवेंद्र शर्मा किडनी प्रत्यारोपण टोळीत सामील झाला. प्रतिरोपणात सात लाखांच्या दराने 125 प्रत्यारोपण केले आहेत.

Leave a Reply

आपलं सरकार