Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaEffectPuneUpdate : नातेवाईकांनी नकार दिल्याने सरपंचाने केले कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार

Spread the love

कोरोनाचा कहर देशात सुरु होऊन पाच महिने उलटत आले तरी लोकांच्या मनातील कोरोनाची भीती जायला तयार नाही . याच भीतीमधून अशीच एक काळजाला घर करणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांची असमर्थता दाखवली. त्यामुळे अखेर सरपंचाने मुखाग्नी दिल्याचं समोर आलं आहे. कोरोनामुळे रक्ताची नाती दूर झाली. मात्र, गावचा सरपंचाने पुढे येऊन सामाजिक जबाबदारी पार पाडल्याचा प्रकार पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडला आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचं नाते श्रेष्ठ असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालयात दोन कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याने या दोन्ही मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांनी असमर्थता दाखवली.

यामुळे मृतांवर अंत्यसंस्कार कोण करणार असा प्रश्न होता. यासाठी खुद्द मंचरचे सरपंच दत्ता गांजळे पुढे आले आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतः हॉस्पिटलमधून दोन्ही मृतदेह घेऊन या दोन्ही मृतांवर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. दत्ता गांजळे यांच्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतूक होत आहे. कोरोनाच्या संकटाचा लढा देण्यासाठी संपूर्ण जगातील व्यवस्था कामाला लागली आहे. आरोग्य व्यवस्था रुग्णांसाठी दिवस रात्र काम करत आहे. पोलीस कर्मचारी ते नेते मंडळी कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी झटत आहे. अशात आपणही माणूसकी विसरून चालणार नाही. आपल्या देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी सगळ्यांना मदत करणं आणि त्यांच्यासाठी उभं राहणं महत्त्वाचं आहे. हाच एक मौल्यवान संदेश दत्ता गांजळे यांनी त्यांच्या कामातून दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!