AurangabadCoronaEffect : स्वत:ची रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन पळून गेलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीकडून टास्क फोर्स कर्मचाऱ्यास मारहाण…

Advertisements
Advertisements
Spread the love

महानगर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कोरोना टास्क फोर्सच्या कर्मचा-याला चौघांनी शिवीगाळ व मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास हमालवाडा येथील अमृत प्लाझाच्या गेटजवळ घडली. महानगर पालिकेच्या टास्क फोर्स टिममधील ऋषीकेश श्रीरंग इंगळे (२३, रा. छत्रपतीनगर, सातारा परिसर) हे जालाननगरातील मनोजकुमार याने त्याचे नाव मोहनकुमार असल्याचे सांगितले होते. तसेच त्याने नाव व पत्ता खोटा सांगितला होता. त्यावरुन त्याने स्वत:ची रॅपीड  अ‍ॅन्टीजेन टेस्ट करुन घेतली. तसेच अहवाल येण्यापुर्वीच तो निघून गेला. त्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून इंगळे पथकासह मनोजकुमारचा शोध घेत त्याचा मुलगा केतुल गज्वर याच्यापर्यंत पोहोचले. त्याला सोबत घेऊन इंगळे पथकासह चर्चा करत असताना तेथे आलेल्या प्रविण अहिरे, विशाल नरवडे यांच्यासह अन्य दोघांनी ‘तुम्ही कोण आहात, कोठून आलात, येथून निघून जा’ असे म्हणत इंगळे यांच्याशी अरेरावीची भाषा केली. तसेच शिवीगाळ व मारहाण केली. त्यावरुन सातारा पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कराळे करत आहेत.

Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार