Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMharashtraUpdate : नवी मुंबई , ठाण्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनची घोषणा

Spread the love

ठाणे आणि नवी मुंबई शहरात कोरोनाचा कहर सुरुच असून दररोज कोरोना रुग्णसंख्येत भर पडत असल्याने  या दोन्हीही शहरात पुन्हा लॉकडाउन होणार का याबाबत नागरीकांमध्ये उत्सुकता होती. शहरात आतापर्यंत एकूण १५ हजार ३८५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत तर ४१८ जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात पुन्हा एकदा ४६ प्रतिबंधित क्षेत्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी व्यवहार नियमित सुरु राहतील असे आदेशित करण्यात आले आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात यापूर्वी ३ जुलैच्या मध्यरात्रीपासून १३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत १० दिवसाचा लॉकडाउन घेण्यात आला होता. त्यानंतर आठ दिवसानी टाळेबंदी वाढवून ती १९ जुलैपर्यंत करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा  शहरात फक्त प्रतिबंधित क्षेत्रातच लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.  शहरातील ४६ प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणचे व्यवहार सुरळीत होणार आहेत. शहरात राज्य शासनाने जाहीर करण्यात आल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन ३ प्रमाणे मॉल्स, मार्केट व कॉम्प्लेक्समधील दुकाने  सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत समविषम पद्दतीने दुकाने सुरु राहणार आहेत. पण मॉलमधील उपहारगृहे व चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत. नवी मुंबई शहरात करोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता लॉकडाउन न करता फक्त प्रतिबंधित क्षेत्रातच ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन असणार आहे. नागरिकांनी नियमात राहून पालिकेला सहकार्य करावे असं आवाहन पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केलं आहे.

दरम्यान कोरोनामुळे निर्माण झालेलं संकट अद्यापही टळलेलं नसल्याने ठाण्यातही  ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. ठाणे महापालिकेकडून हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम असेल असं जाहीर करण्यात आलं आहे. यासंबंधी महापालिकेकडून अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये याआधी जाहीर करण्यात आलेले निर्बंध कायम असणार आहेत.

नव्या आदेशात देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे, हॉटस्पॉट क्षेत्राव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन सुरु राहील. यामध्ये प्रामुख्याने मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स, जीम व स्विमिंग पूल वगळता सर्व भाजी मार्केटसह बाजारपेठ आणि दुकाने पी-१ आणि पी-२ तत्त्वावर चालवण्यास परवानगी आहे. यानुसार रस्त्याच्या एका बाजूला दुकाने, लेन, पॅसेज इत्यादी सम तारखांना उघडले जावेत. तर दुसऱ्या बाजूची दुकानं विषम तारखेला उघडली जावीत. ही दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत उघडी राहतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!