Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AyoddhyaNewsUpdate : अयोध्या : बुद्धांची साकेत नगरीच पण न्यायालयाचा आदर करून इतरत्र बुद्धविहार बांधण्याचा रामदास आठवले यांचा निर्धार…

Spread the love

अयोध्येत राम मंदिराच्या जागेवर बुद्धावशेष सापडत असल्याने या जागेवर बुद्ध विहार व्हावे अशी मागणी सातत्याने पुढे येत असतानाच प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनीही हि मागणी केली आहे त्यावर आपली प्रतिक्रिया देताना केंद्रीय सामाजिक नीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे कि , सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्येची जागा आता  राम मंदिराला देण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टाचा आम्ही आदर करतो.परंतु अयोध्येमध्ये बुध्दविहार असावं यासाठी माझी हालचाल यापूर्वीपासून सुरु आहे. सरकारकडून जागा मिळाली तर ठीकच आहे पण सरकारकडून जागा मिळणार नसेल तर अयोध्येमध्ये एखादं बुद्ध मंदिर असावं, या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे . मी योगी आदित्यनाथ यांनाही भेटणार  आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकानंतर आपला संपूर्ण देश बुद्धिस्ट होता, त्यामुळे या देशातली सगळी मंदिरं हि बुद्ध मंदिरं होती असेही आठवले यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले आहे.


दरम्यान आयोध्येत सापडलेल्या बौद्धकालीन अवशेषांचे जतन करण्यात यावे व त्यासाठी एक बुध्दविहार साकारण्यासाठी सर्व बौद्ध समाजाने, नेत्यांनी एकत्र यावे, असं आवाहन गायक आनंद शिंदे यांनी केलं आहे. अयोध्येत सापडलेले प्राचीन अवशेष बौद्ध धम्माशी संबंधित असल्याचा दावा ऑल इंडिया मिल्ली काऊन्सिलचे सरचिटणीस कालिक अहमदखान यांनी सुद्धा केला आहे. त्यामुळे अयोध्येत बुध्दविहार निर्माण व्हावे यासाठी देशातील सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र होऊन लढा देणे गरजेचे असल्याचं आनंद शिंदे यांनी म्हटलं आहे. ‘राम मंदिराच्या उभारणीसाठी जमिनीचे सपाटीकरण करताना आढळून आलेल्या प्राचीन मूर्ती व अवशेषांवरून ही बुद्धभूमी असल्याचे स्पष्ट होते. जमीन सपाटीकरणात जे प्राचीन अवशेष सापडले ते सम्राट अशोकाच्या शासन काळातील आहेत. काही लोकांनी रामजन्मभूमी परिसराचे निष्पक्ष उत्खनन करण्यात यावे, अशी मागणी यूनेस्को या जागतिक पातळीवरील संघटनेकडे केली आहे. देशातील अनेक बडे आंबेडकरी नेते हे वेगवेगळ्या पक्ष,संघटना यामध्ये विभागले आहेत. परंतु अशा वेळी सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येऊन आयोध्येत एक उत्कृष्ट बुध्दविहार व बौद्ध अवशेष, मुर्त्यांचे जतन करण्यासाठी संग्राहलय उभे करावे अशी प्रमुख मागणी घेऊन सर्व आंबेडकरी नेत्यांनी, भिमबांधवांनी व्यापक लढा उभा करुन आपला अधिकार मिळवला पाहिजे,’ असंही आनंद शिंदे यांनी म्हटलं आहे.

याबाबत आपली प्रतिक्रिया देताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र या वादात न  पडता आपली भूमिका जाहीर करताना म्हटले आहे कि , ‘भारत बौद्धमय असताना अयोध्येचे नाव साकेत नगरी होते. अयोध्येत बाबरी मस्जिद उभारण्याआधी राम मंदिर होते आणि त्यापूर्वी बुद्ध विहार होते. मात्र अयोध्येतील मंदिर मस्जिदचा वाद कायमचा मिटला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानानुसार न्यायालयाने निकाल दिला असून त्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर होणार आहे. तसंच मस्जिदलाही जागा देण्यात आली असून वादग्रस्त जागा सोडून अयोध्येत अन्यत्र जमीन घेऊन तेथे भव्य बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ अडीच हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकानंतर आपला संपूर्ण देश बुद्धिस्ट होता, त्यामुळे या देशातली सगळी मंदिरं हि बुद्ध मंदिरं होती. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्येची जागा आता  राम मंदिराला देण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टाचा आम्ही आदर करतो.परंतु अयोध्येमध्ये बुध्दविहार असावं यासाठी माझी हालचाल यापूर्वीपासून सुरु आहे. सरकारकडून जागा मिळाली तर ठीकच आहे पण सरकारकडून जागा मिळणार नसेल तर अयोध्येमध्ये एखादं बुद्ध मंदिर असावं, या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे . मी योगी आदित्यनाथ यांनाही भेटणार  आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!